Advertisement

श्रद्धाने केलं ‘बाहुबली’चं तोंड गोड!

महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला तीळाच्या लाडूसोबत ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असं म्हणत तोंड गोड करण्याची प्रथा आहे. मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूरने ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासला तीळाचे लाडू देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रद्धाने केलं ‘बाहुबली’चं तोंड गोड!
SHARES

महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला तीळाच्या लाडूसोबत ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असं म्हणत तोंड गोड करण्याची प्रथा आहे. मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूरने ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासला तीळाचे लाडू देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


गोड बोलण्याचा संदेश

मागील काही दिवसांपासून श्रद्धा मुंबई आणि हैदराबादमधील बीचवर ‘छिछोरा’ आणि ‘साहो’ या आपल्या आगामी सिनेमांचं चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे. या सोबतच आपला मराठी बाणा जपत ती मकर संक्रांतीचा सणही साजरा करत आहे. तीळगुळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देण्यासोबतच पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी ती मुंबईत परतली आहे.


लाडू देऊन केलं तोंड गोड

तत्पूर्वी श्रद्धाने तीळाचे लाडू देत प्रभासचं तोंड गोड केलं. श्रद्धाच्या घरच्या खाद्यपदार्थांची चित्रपटसृष्टीत नेहमीच चर्चा असते. ज्या सिनेमाचं शूटिंग करत असते, त्या सेटवर ती कायम घराचे पदार्थ आपल्या सहकलाकारांसोबत तंत्रज्ञांसोबत शेअर करते. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त श्रद्धाच्या घरी तिळाचे लाडू बनवण्यात आले आहेत. सध्या हैदराबादमधील चारमीनार परिसरात ‘साहो’चं चित्रीकरण असून, सेटवरील सर्वांनी श्रद्धाने दिलेल्या लाडूंसोबतच देशी तूपामध्ये बनलेल्या खिचडीवर ताव मारला. यात प्रभास आघाडीवर होता.


'तीळगुळ घ्या गोड गोड बोला'

श्रद्धा सध्या आपल्या आगामी चित्रपटांमध्ये चांगलीच बिझी आहे. यात ‘साहो’, ‘छिछोरा’, ‘सायना’ आणि ‘एबीसीडी’ या आगामी चित्रपटांमध्ये ती वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रेक्षकांना भेटणार आहे. हिंदी चित्रपटांची नायिका असली तरी मकर संक्रांतीचा सण साजरा करताना ‘तीळगुळ घ्या गोड गोड बोला’ असं म्हणायला श्रद्धा विसरलेली नाही.


हेही वाचा- 

'मणिकर्णिका'मध्ये मराठी वेशभूषाकाराची जादू!

संदीपने काढलं 'डोंबिवली रिटर्न' तिकीट!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा