Advertisement

नोकरदारांसाठी खुशखबर! ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न लवकरच करमुक्त

निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला खुश करण्यासाठी केंद्राकडून लवकरच आयकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

नोकरदारांसाठी खुशखबर! ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न लवकरच करमुक्त
SHARES

निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला खुश करण्यासाठी केंद्राकडून लवकरच आयकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अडीच लाखांएेवजी ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्राकडून मिळत आहेत. तर यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडून केली जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय देशभरात मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बाब ठरणार आहे.


५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

सध्याच्या कररचनेनुसार अडीच लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त असून अडीच लाख ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के आयकर आकारला जातो. तर ५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी २० टक्के तर १० लाखांहून अधिक उत्पन्नासाठी ३० टक्के आयकर आकारला जातो. आता मात्र यापुढं ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत मध्यमवर्गीय नोकरदारांना खुश करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ५ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करतानाच वैद्यकीय आणि परिवहन भत्तादेखील पुन्हा सुरू केला जाण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

मांजा गळ्यात अडकून तरूणाचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा