मांजा गळ्यात अडकून तरूणाचा मृत्यू

मुंबईत संक्रांतीला पतंग उडवताना काळजी घ्या. कारण विलेपार्ले इथं मांजा गळ्यात अडकून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मांजा गळ्यात अडकून तरूणाचा मृत्यू
SHARES

मुंबईत संक्रांतीला पतंग उडवताना काळजी घ्या. कारण विलेपार्ले इथं मांजा गळ्यात अडकून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नितेश पातरे असं या मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.


मांजानं कापला गळा 

वर्षाभरापूर्वीच नितेशचं लग्न झालं असून तो पत्नीसह वडाळ्यातील भाग्योदय सोसायटीत रहात होता. नितेश हा अंधेरीतल्या सिप्झ इथं कामाला होता. नेहमीप्रमाणे तो कामावरून घरी परतत होता. नितेश हा दुचाकीनं वेस्टर्न हायव्हेवरील सेंट्रल उड्डाणपूलाहून उतरत असताना पंतगाच्या मांजानं त्याचा गळा कापला. त्यावेळी नितेशचे गाडीवरील ही नियंत्रण सुटले आणि त्याचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की नितेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला स्थानिक नागरिकांनी तातडीनं कूपर रुग्णालायत नेलं. मात्र डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.  या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपघाती गुन्ह्यांची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत



हेही वाचा -

एसटीच्या ४,४१६ पदांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा