Advertisement

एसटीच्या ४,४१६ पदांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध

दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा ( एसटी )ने अखेर ४,४१६ पदांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एसटीच्या ४,४१६ पदांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध
SHARES

दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा ( एसटी )ने अखेर ४,४१६ पदांच्या मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्याल आलेल्या मेगा भरतीच्या जाहिरातीतील ४,४१३ पद ही दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगार तरूण-तरूणांसाठी असून त्यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. तर ही पद चालक आणि वाहक पदासाठी आहे. दरम्यान औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.


दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक

एसटीच्या जाहिरातीनुसार दुष्काळग्रस्त भागातील दहावी उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज भरता येणार आहे. तर त्याच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना असणं ही बंधनकारक असणार आहे. तसंच, अवजड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा. त्याचप्रमाणं, आरटीओचा चालक व वाहकाचा बिल्ला असणे आवश्यक असणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण व केंद्र शासनाने नुकतेच जाहीर केलेले १० टक्के आर्थिक दुर्बल आरक्षणासह जाहिरात देणारी एसटी महामंडळ ही राज्यातील पहिली संस्था आहे.




१८ जानेवारीपासून सुरूवात

'चालक आणि वाहक' या पदासाठी चालक व वाहक पदाची एकत्रित पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. एसटी महामंडळानं प्रसिद्ध केलेली जाहिरात १६ जानेवारीपासून msrtc.gov.in आणि msrtcexam.in या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. पदांसाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे.


हेही वाचा -

हार्दिक आणि राहुल याच्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांनीही केली टीका

बेस्ट संपाचा आठवा दिवस, आज तोडगा निघण्याची शक्यता



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा