Advertisement

मकरसंक्रात आणि मोदींची थापांची पतंगबाजी, राज ठाकरेंनी पुन्हा उडवली खिल्ली

राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात मोदी मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजी करत असून यावेळी त्यांच्यासोबत भाजपा अध्यक्ष अमित शाह, मोदी भक्त, भाजप आणि मीडिया पतंगाच्या मांज्याची फिरकी सांभाळताना दिसत आहेत.

मकरसंक्रात आणि मोदींची थापांची पतंगबाजी, राज ठाकरेंनी पुन्हा उडवली खिल्ली
SHARES

सण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाजपा वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारं व्यंगचित्र हे आता जणू काही समीकरणचं झालं आहे. अगदी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला... असं म्हणत साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशीही राज ठाकरे यांनी मोदींची खिल्ली उडवण्याची संधी सोडलेली नाही. लोकसभा-विधानसभा निवडणुका जवळ येत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा सरकार आणि मोदींकडून नव्या नव्या घोषणा केल्या जात आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा म्हणजे सवर्णांना देण्यात आलेलं १० टक्के आरक्षण. मोदींची ही घोषणा म्हणजे नव्या थापांची पतंगबाजी असल्याचं दाखवणारं व्यंगचित्र काढत राज ठाकरे यांनी काढत मोदींची खिल्ली उडवली आहे. 


१० टक्के आरक्षणही थाप

राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात मोदी मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजी करत असून यावेळी त्यांच्यासोबत भाजपा अध्यक्ष अमित शाह, मोदी भक्त, भाजप आणि मीडिया पतंगाच्या मांज्याची फिरकी सांभाळताना दिसत आहेत. मोदींनी याआधी स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, जीएसटी, कर्जमाफी, वर्षाला दोन कोटी रोजगार यांसह आतापर्यंत अनेक आश्वासनांची पतंगबाजी केली आहे. ही आश्वासन हवेतून उडवून झाल्यानंतर कसं आता नवीन आश्वासनाचा पतंग मोदी हवेत उडवत आहेत हे राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मांडलं आहे.

सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याची मोदींची घोषणा ही नवी थाप असल्याची टीका राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून केली आहे. मोदींची आतापर्यंतची सर्व आश्वासन ही थापाच ठरल्या असून १० टक्के आरक्षण ही पण एक नवी थाप असून निवडणुकीच्या तोंडावरची मोदींचीही थापांची नवी पतंगबाजी असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.



हेही वाचा - 

सवर्ण आरक्षण संविधानाच्या तत्वांविरोधात, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

आता गरीब सवर्णांनाही १० टक्के आरक्षण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा