Advertisement

१९ जानेवारीपासून मध्य रेल्वेवरून धावणार 'राजधानी एक्सप्रेस'

राजधानी एक्सप्रेस आता मध्य रेल्वे मार्गावरून धावणार असून नाशिकमार्गे दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे नाशिक-धुळे-जळगावकरांकरता हा मोठा दिलासा मानला जात आहे. १९ जानेवारीपासून नाशिक-धुळे-जळगावकरांना राजधानीनं दिल्ली गाठता येणार आहे.

१९ जानेवारीपासून मध्य रेल्वेवरून धावणार 'राजधानी एक्सप्रेस'
SHARES

मुंबई-दिल्ली प्रवास सुपरफास्ट आणि आरामदायी व्हावा असं वाटणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी राजधानी एक्सप्रेस हाच एकमेव पर्याय असतो. त्यामुळे राजधानी एक्सप्रेसला प्रवाशांची चांगलीच पसंती मिळते. आता मुंबईकरांसोबतच नाशिक-धुळे आणि जळगावकरांचाही दिल्ली प्रवास सुपरफास्ट आणि आरामदायी होणार आहे. कारण राजधानी एक्सप्रेस आता मध्य रेल्वे मार्गावरून धावणार असून नाशिकमार्गे दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे नाशिक-धुळे-जळगावकरांकरता हा मोठा दिलासा मानला जात आहे. १९ जानेवारीपासून नाशिक-धुळे-जळगावकरांना राजधानीनं दिल्ली गाठता येणार आहे.


नाशिकमार्गे राजधानी दिल्लीला

नाशिक-धुळे-जळगाव येथील प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी मुंबईला यावं लागतं होतं. त्यामुळे त्यांचा दिल्ली प्रवास सोपा व्हावा यासाठी राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेवरून नाशिकमार्गे दिल्लीला न्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. ही मागणी मान्य करत रेल्वे प्रशासनानं राजधानी एक्सप्रेस १९ जानेवारीपासून मध्य रेल्वेवरून नाशिकमार्गे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी टर्मिनसमधून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दिन (दिल्ली)ला पोहचणार आहे.

कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर एक्सप्रेसला थांबा घेेण्यात येणार आहे. राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून दर बुधवारी आणि शनिवारी सुटणार आहे. बुधवारी आणि शनिवारी गाडी क्र. २२२२१ सीएसएमटी ते निझामुद्दिन राजधानी एक्स्प्रेस सकाळी २.२० वाजता सुटणार आहे. तसंच, गुरुवारी आणि रविवारी गाडी क्र. २२२२२ निझामुद्दिन ते सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे. मध्य रेल्वेवरील राजधानीची देखभाल मुंबई सीएसएमटी येथील वाडी बंदर येथे करण्यात येणार आहे. तसंच, या एक्स्प्रेसला १५ बोगी असणार आहेत. राजधानी एक्स्प्रेस नाशिकमार्गे मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.


१७ तासांएेवजी आता २० तासांचा प्रवास

मध्य रेल्वेवरून राजधानी एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेत रेल्वे प्रशासनाने नाशिक-धुळे आणि जळगावमधील प्रवाशांना दिलासा दिलाय खरा. पण त्याचवेळी मुंबई ते दिल्ली प्रवास आता १७ तासांएेवजी २० तासांचा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून थोडी नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

पुन्हा छमछम! मुंबईसह राज्यातील डान्स बार पुन्हा होणार सुरू

अपघात टाळण्यासाठी मुंबई लोकलच्या दरवाजावर निळे दिवे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा