Advertisement

अपघात टाळण्यासाठी मुंबई लोकलच्या दरवाजावर निळे दिवे


अपघात टाळण्यासाठी मुंबई लोकलच्या दरवाजावर निळे दिवे
SHARES

धावती लोकल पकडताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं एक पाऊल उचलंय. लोकलच्या प्रत्येक दरवाजावर निळ्या रंगाचा दिवा बसवण्यात येणार आहे. लोकल सुरू होत असताना हा दिवाही पेटेल. त्यामुळे आता लोकल सुरू होणार असल्याचं प्रवाशांना समजणार आहे. या उपायामुळे धावती लोकल पकडताना होणारे अपघात रोखणं शक्य होणार आहे. सध्या एखाद दुसऱ्या रेल्वेच्या डब्यांना निळा दिवा बसवण्यात आला आहे. येत्या काळात इतर रेल्वेच्या डब्यांनाही दिवा बसवण्यात येईल.

निळा दिवा 'असा' काम करतो 

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत लोकल सुरू होत असताना निळा दिवा पेटताना दिसत आहे. लोकल प्लॅटफॉर्मवरून रवाना होण्याआधी दिवा तीन-चार वेळा चालू-बंद होतो. लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांसाठी प्रत्येक डब्याच्या दरवाजाच्या वरच्या बाजूस निळया रंगाचा दिवा लावण्यात आला आहे. हा दिवा प्रवाशांना लोकल सुरू झाल्याचं सूचित करेल. यामुळे शेवटच्या क्षणी लोकलमध्ये चढताना होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील’, असे पीयूष गोयल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीलं आहे.

अपघातांना बसणार आळा?

प्रवाशांना धावती लोकल पकडू नका अशा सुचना वारंवार रेल्वेतर्फे केल्या जातात. या सुचनांकडे कानाडोळा करून प्रवासी जीव धोक्यात घालून धावती लोकल पकडतात. त्यामुळे धावती लोकल पकडताना तोल गेला तर प्रवाशाचा मृत्यू होतो किंवा प्रवासी जखमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या लाईट्स लोकलच्या प्रत्येक दरवाजावर बसवण्यात येणार आहेत.


हेही वाचा

मध्य रेल्वे मार्गावर मार्च महिन्याच्या अखेरीस धावणार २ एसी लोकल?

नवीन वर्षात प.रे.वर होणार ३४ पादचारी पूल, ८५ सरकते जीने, ५९ लिफ्ट


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा