Advertisement

नवीन वर्षात प.रे.वर होणार ३४ पादचारी पूल, ८५ सरकते जीने, ५९ लिफ्ट

पश्चिम रेल्वेवरील सर्व पादचारी पूल, सरकते जीने, लिफ्ट आणि इतर सुविधांची कामे २०१९ मध्ये पूर्ण करण्यात येणार अाहेत.

नवीन वर्षात प.रे.वर होणार ३४ पादचारी पूल, ८५ सरकते जीने, ५९ लिफ्ट
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. येत्या नवीन वर्षात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेनं चर्चगेट ते विरार दरम्यानच्या स्थानकांत ३४ पादचारी पूल बांधण्याचा तर ८५ सरकते जीने आणि ५९ लिफ्ट बसविण्याचा निर्णय घेतला आहे.


डीआरएमपदी सुनील कुमार साग

पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पदी रविवारी सुनील कुमार साग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्व पादचारी पूल, सरकते जीने, लिफ्ट आणि इतर सुविधांची कामे २०१९ मध्ये पूर्ण करण्यात येणार अाहेत. तर सर्व स्थानकांत तिकीटासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागतात. त्यामुळं या रांगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलद तिकीट बुकींग आणि स्थानकातील प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सुनील कुमार साग यांनी पदभार स्विकारताना सांगितलं. 


युटीएस खिडक्या 

 पश्चिम रेल्वेनं २२ रेल्वे स्थानकांवर सिझन तिकिटांसाठी २५ खिडक्या उघडल्या आहेत. तसंच, जेष्ठ नागरिक, अपंग आणि महिला प्रवाशांसाठीही ११ स्थानकांवर १३ स्पेशल युटीएस खिडक्या उघडल्या अाहेत. 



हेही वाचा - 

Good News: एसटी कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी ६ महिन्यांची रजा

एसटीच्या ३३०७ चालक-वाहकांना न्यू इयरचं अनोखं गिफ्ट




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा