Advertisement

एसटीच्या ३३०७ चालक-वाहकांना न्यू इयरचं अनोखं गिफ्ट

इच्छितस्थळी बदलीची मागणी करणाऱ्या ३३०७ चालक-वाहकांना इच्छित स्थळी बदली देण्यात आली आहे. बदली देण्यात आलेले बहुतांश चालक-वाहक हे कोकणात कार्यरत असलेले आहेत.

एसटीच्या ३३०७ चालक-वाहकांना न्यू इयरचं अनोखं गिफ्ट
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा (एसटी) ने ३३०७ चालक-वाहकांना न्यू इयरच अनोखं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट आहे इच्छित स्थळी बदलीचं.  एखादा चालक-वाहक मुळचा पुण्याचा असेल तर त्याचं कामाचं ठिकाण सिंधुदुर्ग असतं. तर एखादा चालक-वाहक नागपुरचा असेल तर त्याचं कामाचं ठिकाण सांगली असतं. अशा घरापासून-गावापासून वेगळ्या ठिकाणी, लांब काम करणाऱ्या चालक-वाहकांकडून दहा ते पंधरा वर्षांपासून आपल्या गावच्या ठिकाणी (इच्छित स्थळी) बदलीची मागणी होत होती. अखेर ही मागणी एसटीनं मान्य केली आहे.


निर्णयाचं स्वागत

इच्छितस्थळी बदलीची मागणी करणाऱ्या ३३०७ चालक-वाहकांना इच्छित स्थळी बदली देण्यात आली आहे.  बदली देण्यात आलेले बहुतांश चालक-वाहक हे कोकणात कार्यरत असलेले आहेत.  एसटीच्या या निर्णयामुळे चालक-वाहकांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. तर या निर्णयाचं एसटी कर्मचारी संघटनांनी स्वागत केलं आहे.


कोकणातील चालक-वाहकांकडून मागणी

एसटीच्या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्या विभागात अर्ज केला असेल त्याच विभागात चालक-वाहकांना कार्यरत रहावं लागतं. एसटीत चालक-वाहक म्हणून नोकरी करण्यासाठी महाराष्ट्रभरातील तरुण इच्छुक असतात. त्यामुळं प्रत्यक्षात नोकरीत रूजू होऊन काम करताना चालक-वाहकांना घरापासून रहावं लागतं. त्यातही कोकणात कायमस्वरूपी काम करण्यासा राज्यातील इतर भागातील चालक-वाहक तयार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच कोकणातील चालक-वाहकांकडून मोठ्या संख्येने इच्छित स्थळी बदलीची मागणी केली जाते. 


एेतिहासिक निर्णय

७ जानेवारी २०१९ पर्यंत या चालक-वाहकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश संबंधीत विभाग प्रमुखांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून देण्यात आले आहेत. या निर्णयाचं चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं असून हा निर्णय एेतिहासिक आहे. या निर्णयामुळे चालक-वाहकांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.



हेही वाचा - 

'एमयूटीपी-३ अ' प्रकल्पाला निती आयोगाची मंजुरी

पश्चिम रेल्वेवर तिसऱ्या डोळ्याची नजर वाढली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा