Advertisement

'एमयूटीपी-३ अ' प्रकल्पाला निती आयोगाची मंजुरी

'एमयूटीपी-३ अ' या प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डातर्फे निती आयोगापुढे सादर करण्यात आला होता. त्यावेळी निती आयोगाने प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यानंतर येत्या काही दिवसांत प्रकल्प 'कॅबिनेट कमिटी ऑफ इकोनॉमिक अफेअर' (सीसीईए) पुढे सादर करण्यात येणार असून प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.

'एमयूटीपी-३ अ' प्रकल्पाला निती आयोगाची मंजुरी
SHARES

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प ३-अ (एमयूटीपी ३ अ) च्या ५४ हजार ७७७ कोटी रुपयांच्या आराखड्यास महाराष्ट्र शासनाने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर आता रेल्वे बोर्डासह निती आयोगानेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर लगेच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

'एमयूटीपी-३ अ' या प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डातर्फे निती आयोगापुढे सादर करण्यात आला होता. त्यावेळी निती आयोगाने प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यानंतर येत्या काही दिवसांत प्रकल्प 'कॅबिनेट कमिटी ऑफ इकोनॉमिक अफेअर' (सीसीईए) पुढे सादर करण्यात येणार असून प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.

'एमयूटीपी-३ अ'अंतर्गत होणाऱ्या कामांना लागणारा निधी

 • २१० एसी लोकलकरीता १७ हजार ३७४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहेत.
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल उन्नत जलद मार्गाकरीता १२ हजार १३१ कोटी रुपये निधी लागणार आहे.
 • गोरेगाव-बोरीवली हार्बर मार्गाच्या विस्ताराकरीता ८२६ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
 • पनवेल-विरार कॉरिडोरकरीता ७०८९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
 • बोरीवली-विरार पाचव्या व सहाव्या मार्गिकेकरीता २१८४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
 • कल्याण-आसनगाव चौथी मार्गिकेकरीता १७५९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
 • कल्याण यार्ड आधुनिकीकरणाकरीता ९६१ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
 • सीबीटीसी सिग्नल यंत्रणाकरीता ५८२८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
 • स्थानक विकासकरीता ९४७ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
 • २१० एसी लोकलकरीता १७ हजार ३७४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
 • गाड्यांच्या देखभाल सुविधेकरीता २३५३ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

'एमयूटीपी-३ अ' प्रकल्पासाठी ५४ हजार ७७७ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामधील निम्मा खर्च म्हणजे २७ हजार ३८९ कोटी रुपये उचलण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे.हेही वाचा-

पश्चिम रेल्वेवर तिसऱ्या डोळ्याची नजर वाढली

ठाणे मेट्रो आता गायमुखपर्यंत; कासारवडवली ते गायमुख मेट्रो-४ अ ला हिरवा कंदीलसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा