Advertisement

Good News: एसटी कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी ६ महिन्यांची रजा

नोकरी करत असताना मुलांकडे विशेष लक्ष देणं, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं महिला कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेत एसटीनं ६ महिन्यांची १८० दिवसांची रजा आता महिला कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. त्याचवेळी महत्त्वाचं म्हणून पत्नी हयात नसलेल्या अर्थात सिंगल फादर कर्मचार्यालाही या ६ महिन्यांच्या रजेचा लाभ मिळणार असल्याचं रावते यांंनी स्पष्ट केलं आहे.

Good News: एसटी कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी ६ महिन्यांची रजा
SHARES

केंद्र सरकारनं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्र सरकारच्या सेवेतील सिंगल फादर असलेल्या कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांची बालसंगोपन रजा लागू केली आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)ने देखील महिला कर्मचारी, सिंगल फादर आणि पत्नी असाध्य आजारानं अंथरूणाला खिळलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या निर्णयाची घोषणा रविवारी केली.

नववर्षाची भेट

दोन दिवसांपूर्वीच एसटीनं ३३०७ कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी बदली देण्याचा निर्णय घेत नववर्षाची मोठी भेट दिली होती. त्यापुढे जात एसटीनं कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेच्या माध्यमातून नववर्षाची आखणी एक दुसरी भेट दिली आहे. एसटीमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांची प्रसुती रजा मिळत होती. मात्र प्रसुतीनंतर बाळाला आईची आणि आईला बाळाची असलेली गरज लक्षात घेता एसटीनं या रजेत ३ महिन्यांची वाढ करत प्रसुतीची रजा ९ महिन्यांची यापूर्वीच केली आहे. यापुढचा टप्पा म्हणून महिलांना बालसंगोपनाची १८० दिवसांची रजा देण्याचाही निर्णय रविवारी जाहीर केला आहे.

मुलांककडे लक्ष देण्यासाठी

नोकरी करत असताना मुलांकडे विशेष लक्ष देणं, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं महिला कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेत एसटीनं ६ महिन्यांची १८० दिवसांची रजा आता महिला कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. त्याचवेळी महत्त्वाचं म्हणून पत्नी हयात नसलेल्या अर्थात सिंगल फादर कर्मचार्यालाही या ६ महिन्यांच्या रजेचा लाभ मिळणार असल्याचं रावते यांंनी स्पष्ट केलं आहे.

कशी मिळेल रजा?

तर असाध्य आजाराने एखाद्या कर्मचाऱ्यांची पत्नी अंथरूणाला खिळली असेल, त्या पुरूष कर्मचाऱ्यालाही ६ महिन्यांची बालसंगोपनाची रजा मिळणार आहे. दरम्यान १८ वर्षापर्यंतच्या मुलांच्या संगोपनासाठीच ही रजा लागू होणार आहे. तर एका वर्षात दोन महिन्यांच्या कमला मर्यादेत रजा घेता येणार आहे. तर पहिल्या दोन मुलांसाठी-आपत्यासाठीच ही रजा लागू असेल.

हेही वाचा-

एसटीच्या ३३०७ चालक-वाहकांना न्यू इयरचं अनोखं गिफ्ट

एसटीतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर; लिपिक-टंकलेखक संवर्गात २५ टक्के आरक्षण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा