Advertisement

एसटीतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर; लिपिक-टंकलेखक संवर्गात २५ टक्के आरक्षण

एसटीमध्ये आजच्या घडीला सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी काम करतात. त्यातील ६० ते ७० हजार कर्मचारी, चालक-वाहक, सहाय्यक, शिपाई आणि तत्सम पदावर काम करणारे आहेत. हे कर्मचारी एकदा का या पदावर रूजू झाले की मग ३०-३५ वर्षानंतरच त्याच पदावरून ते सेवानिवृत्त होतात.

एसटीतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर; लिपिक-टंकलेखक संवर्गात २५ टक्के आरक्षण
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) त काम करणाऱ्या वाहक-चालकांसाठी एसटीनं अखेर खुशखबर दिली आहे. चालक-वाहक, सहाय्यक, शिपाई आणि तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक-टंकलेखक म्हणून काम करता येणार आहे. कारण लिपिक-टंकलेखक पदासाठीच्या भरतीत एसटीतील वाहक-चालक, सहाय्यक, शिपाई यांना २५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरूवारी केली आहे. 


एकाच पदावर निवृत्ती

एसटीमध्ये आजच्या घडीला सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी काम करतात. त्यातील ६० ते ७० हजार कर्मचारी, चालक-वाहक, सहाय्यक, शिपाई आणि तत्सम पदावर काम करणारे आहेत. हे कर्मचारी एकदा का या पदावर रूजू झाले की मग ३०-३५ वर्षानंतरच त्याच पदावरून ते सेवानिवृत्त होतात. पण त्यांची पदोन्नती काही होत नाही. चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याला जर लिपिक-टकंलेखक म्हणून काम करायचं असेल तर एसटीची भरती परीक्षा पास करावी लागते. आता मात्र चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा पुढं जाण्याचा, पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. 


सर्व पदासाठी अारक्षण

एसटीनं वाहक-चालक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथयालय, परिचर, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी आणि स्वच्छक अशा सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना तृतीय श्रेणीतील लिपिक-टंकलेखक पदाच्या भरतीत २५ टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत 

गणपतीच्या दरम्यान एसटीनं चालक-वाहक, सहाय्यक आणि शिपाई यांनी तृतीय श्रेणीत पदोन्नती देण्यासाठी २५ टक्के आरक्षण देण्याचं जाहीर केलं होतं. या निर्णयामुळं या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. असं असताना आता चतुर्थ श्रेणीतील सर्वच कर्मचाऱ्यांचा आनंद एसटीनं द्विगुणीत केला आहे. वाहक-चालक, सहाय्यक आणि शिपाई यांसह चतुर्थ श्रेणीतील सर्वच्या सर्व कामगारांना आता तृतीय श्रेणीतील पदोन्नतीत २५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ही कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बाब ठरणार हे नक्की. हेही वाचा - 

दुसऱ्या एसी लोकलसाठी करावी लागणार प्रतिक्षा

डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे काढा लोकलचं तिकीट
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा