काळजाचा ठोका चुकवणारी स्टंटबाजी, आता तरुणाला शोधतायेत पोलिस

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्टंट करणाऱ्या युवकांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ कांदिवलीतल्या एका इमरतीतील आहे. स्टंट करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. इतका व्हायरल झाला आहे की पोलिस आता या स्टंट करणाऱ्या मुलांच्या शोधात आहेत.

कांदिवलीतल्या जय भारत इमारतीच्या २२ व्या मजल्यावर खिडकीच्या बाल्कनीमध्ये एक युवक हातावर चालतानाचा स्टंट करताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी त्या जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. जागेबद्दल माहिती मिळताच पोलिस या ठिकाणी पोहोचले. पण स्टंटबाज युवक फरार झाला आहे.

स्टंट करणाऱ्या युवकाचं नाव आणि पत्ता शोधण्यात यश आलं असून युवकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा युवक स्टंट करत होता आणि त्याचे इतर दोन मित्र हे व्हिडीओ तयार करत होते. पोलीस त्या स्टंटबाज युवकाच्या मित्रांचाही शोध घेत आहे.

( कृपया असे स्टंट करणं जिवावर बेतू शकतं. त्यामुळे असे स्टंट करू नयेत.)


हेही वाचा

सायबर चोरट्यांनी घातला शेतकऱ्याला गंडा,तब्बल साडे नऊ लाख चोरले

TRP Scam : अर्णबला कारवाई ‘का’ करू नये म्हणून नोटीस, ACP समोर हजर राहण्याचे आदेश

पुढील बातमी
इतर बातम्या