सायबर चोरट्यांनी घातला शेतकऱ्याला गंडा,तब्बल साडे नऊ लाख चोरले

भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमीष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याचे सांगितले जाते.

सायबर चोरट्यांनी घातला शेतकऱ्याला गंडा,तब्बल साडे नऊ लाख चोरले
SHARES

कोरोना संक्रमाणामुळे पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यातू शेतकरी वर्ग सावरत असताना. डोंगरीमध्ये एका शेतकऱ्याला तब्बल साडे नऊ लाखांना गंडवल्याचे पुढे आले आहे. भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमीष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याचे सांगितले जाते.  या प्रकरणी डोंगरी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- भाजप नेते आशिष शेलार आणि गिरीश महाजनांना धमकीचे फोन

माझगावच्या उमरखाडी परिसरात राहणाऱ्या तक्रारदार हा शेतकरी आहे. शेतात पिकवलेले धान्य, भाज्या शहरात आणून विकतो. फेब्रुवारी महिन्यात फेसबूकवर त्याची मर्सी ग्रेस नावाच्या परदेशी तरुणीशी ओळख झाली. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क-संवाद वाढला. तरुणीने ती अमेरिके ची नागरिक असून तेथील लष्करात कप्तानपदी कार्यरत असल्याचे तक्रोरदाराला सांगितले. तसेच आठ हजार अमेरिकन डॉलर भारतात गुंतवावे, व्यवसाय सुरू करावा, अशी इच्छा व्यक्त के ली आणि मदतीचे आवाहन के ले. पुढे तिने स्वत:हूनच शॉपिंग मॉलची कल्पना सुचवली, भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमंत्रणही दिले. तक्रारदाराने त्याला होकार दिला.

हेही वाचाः- १५ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर धावणार एसी लोकल

तरुणीने जॉन के नडी या व्यक्तीसोबत मुंबईत आठ लाख अमेरिकन डॉलर पाठवते, असे कळवले. मात्र के नडी मुंबईऐवजी दिल्ली विमानतळावर उतरल्याने आणि त्याच्याकडे परदेशी चलन मोठय़ा प्रमाणावर असल्याने कस्टम डय़ुटी भरल्याशिवाय विमानतळाबाहेर सोडणार नाहीत, असे सांगितले. तक्रोरदाराने तिच्या सांगण्यावरून टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये साडेनऊ लाख रुपये भरले. इतकी रक्कम भरूनही मर्सीने आणखी सहा बँक खात्यांचे तपशील पाठवून त्यावर आणखी रक्कम भरण्याची विनंती सुरूच ठेवली. तेव्हा तक्रारदाराला फसवणूक होत असल्याची जाणीव झाली. त्याने तातडीने डोंगरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा