भाजप नेते आशिष शेलार आणि गिरीश महाजनांना धमकीचे फोन

मोठे नेते बनू नका, नाहीतर जिवे मारू, अशा स्वरुपात एक दोन वेळा नव्हे, तर काल दिवसभरात तब्बल १० वेळा आरोपींनी अशा प्रकारे फोन करून धमकावले

भाजप नेते आशिष शेलार आणि गिरीश महाजनांना धमकीचे फोन
SHARES

भाजपाचे नेते आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. यासंदर्भातली तक्रार आशिष शेलार यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी मुंब्रा परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत. काल मध्यरात्री शेलार यांना ८ ते १० धमकीचे कॉल्स आलं होते. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शेलारांनी तक्रार नोंदवली आणि याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.

हेही वाचाः- १५ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर धावणार एसी लोकल

भाजप नेते आशिष शेलार हे त्यांच्या दिवसभरातील कामात व्यस्त असताना. काल त्यांच्या मोबाइलवर एका मागोमाग एक धमकीचे फोन येत होते. मोठे नेते बनू नका, नाहीतर जिवे मारू, अशा स्वरुपात एक दोन वेळा नव्हे,  तर काल दिवसभरात तब्बल १० वेळा आरोपींनी अशा प्रकारे फोन करून धमकावल्याने आशिष शेलारांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. शेलारांनी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. शेलारांना आलेल्या फोनचा माग काढला असता. हे फोन मुंब्रा परिसरातून आल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचाः- एसटी महामंडळातील 'इतके' कर्मचारी कोरोनाबाधित

या प्रकरणाला २४ तास उलटत नाही, तोच जळगावमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन  यांना देखील धमकी आल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे साकारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा काल, मंगळवारी दुपारी पार पडला. या सोहळ्यापूर्वी अनोळखी व्यक्तीने गिरीश महाजन यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाइलवर फोन करून १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर, हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणी रात्री उशिरा जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा