TRP scam : अर्णबला कारवाई ‘का’ करू नये म्हणून नोटीस, ACP समोर हजर राहण्याचे आदेश

वरळी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त(एसीपी) यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी दर्जाच्या अंतर्गत नोटीस बजावून १६ ऑक्टोबरला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

TRP scam : अर्णबला कारवाई ‘का’ करू नये म्हणून नोटीस,  ACP समोर हजर राहण्याचे आदेश
SHARES

टिआरपी घोटाळ्यात संशयाच्या फेरीत अडकलेल्या रिपब्लिक चॅनेलचे अर्णब गोस्वामीला मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई का करू नये म्हणून नोटीस बजावण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात चॅप्टर केसच्या प्रक्रियेला सुरूवात केली असून अर्णबला वरळी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त(एसीपी) यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी दर्जाच्या अंतर्गत नोटीस बजावून १६ ऑक्टोबरला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. चॅनेलच्या माध्यमातून त्याच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचे एकहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचाः- MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली

कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह एका वरिष्ठ धर्माविरोधात अर्णब गोस्वामीने चॅनेलवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी अर्णब विरोधात भादंवि कलम १५३, १५३(अ),१५३(ब), २९५(अ),२९८, ५००, ५०५(२),५०६, १२०(ब) ५०५(२), ५०६ अंतर्गत जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला चौकशीलाही बोलावले होते. त्यावेळी अर्णब त्याच्या वकिलांसह चौकशीला हजर राहिला होता.  

हेही वाचाः- NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

याशिवाय चॅनेलवर अर्णबने वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील लाँकडाऊनमध्ये झालेली गर्दीही एका धार्मिक स्थळाजवळच का झाली. असा प्रश्न उपस्थित करत विशेष समुदायाचे नागरीकच का गर्दी करतात, अशा दावा केला होता. त्यावर आक्षेप घेत, रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून  २९ एप्रिल रोजी पायधुनी पोलिसांनी अर्णब गोस्वामीविरोधात १५३, १५३(अ), २९५५(अ), ५००, ५०५(२),५११, १२०(ब) ५०५(१)(ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या तक्रारीत गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक भारत वृत्तवाहनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सुधीर जाबवडेकर विशेष कार्यकारी दंडाधिकारी या दर्जाने याबाबतच्या सर्व बाबीची पडताळणी करून गोस्वामी यांच्या कार्यक्रमातून धार्मिक तेढ निर्माण करणारे, एकोप्याला बाधा ठरेल अशी वक्तव्य करण्यात आली आहेत, ही खात्री पडल्यामुळे फौजदारी दंड प्र. सं. कलम १०८ (१)(अ) अंतर्गत खटला दाखल करून कार्यवाही सुरू केली आहे. त्या अंतर्गत गोस्वामी यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बंधपत्र का घेऊन नये, यासाठी गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचाः- जनतेच्या श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं सरकारचं प्रथम कर्तव्य; राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं चोख उत्तर

त्यासाठी १६ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वा. उपस्थित राहण्यास सांगण्यात आली आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १११ अंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. गोस्वामी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. विरोधी पक्षही यावेळी गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सादर करेल. विशेष दंडाधिका-यांना गोस्वामी यांच्याविरोधात कारवाई केल्यास त्यांना १० लाखांचे बंधपत्र द्यावे लागणार आहे. या बंधपत्राचा कालावधी एक वर्षाचा असणार असून याशिवाय एक प्रतिष्ठीत व्यक्ती त्यांच्या वागणूकीवर लक्ष ठेवेल, अशा प्रतिबंधात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा