अर्णबच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी केले नवे आरोप

रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अर्बणबवर मुंबई पोलिसांचा अपप्रचार आणि याचिका करून तपासात खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपी पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. या गंभीर आरोपावर न्यायालय आता काय भूमिका घेते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचाः- ३६ हजार कर्मचाऱ्यांना लस; आतापर्यंत १ लाख २५ हजार कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी विरोधात फास आवळण्यास सुरूवात केली आहे. या घोटाळ्यात पोलिसांनी आतापर्यंत अंदाजे पंधराहून अधिक लोकांना अटक केली. त्यात रिपब्लिकचे कर्मचारी आणि अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या आरोपींच्या चौकशीतून या घोटाळ्यात अर्णबचा थेट संबध असल्याचा दावा पोलिसांनी यापूर्वीच केला आहे. मात्र अर्णबकडून ‘घोटाळ्याचा तपास केवळ आम्हाला लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याचा” आरोप करत एआरजी आऊटलायर कंपनीने आणि या कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी केली आहेत. तसेच हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा, अशा विनंतीसह अनेक अर्जही केले आहेत. त्याला मुंबई पोलिस दलाने काही दिवसांपूर्वी प्रतिज्ञापत्रांद्वारे आपले उत्तर दाखल केले.

हेही वाचाः- गतवर्षी मुंबईतील डेंग्यूचं प्रमाण कमी

'या प्रकरणाच्या तपासादरम्यान व्हॉट्सअॅपवरील संभाषण हाती लागले आहेत. त्यातून काही आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे जो घोटाळा झाला आहे त्याचा तपास आणखी सुरू राहण्याची आवश्यकता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे कंपनीच्या या याचिकेच्या माध्यमातून तो तपास थांबू नये. केवळ याचिकादारांनाच पोलिस लक्ष्य करत आहेत, या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. पोलिसांकडून अन्य वाहिन्यांच्या भूमिकेविषयीही तपास सुरू आहे. आजच्या घडीला इंडिया टुडे वाहिनीचा यात संबंध असल्याचे दाखविणारे पुरावे हाती लागलेले नाहीत. मात्र, पोलिसांनी या वाहिनीसह अन्य अनेक वाहिन्यांविषयी तपास सुरू आहे. याचिकादार कंपनीने हा तपास अन्य तपास यंत्रणेकडे हस्तांतर करण्याची विनंती केली असली तरी आरोपींना अशी विनंती करण्याचा अधिकारच नाही. तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असताना अडथळा आणण्याचे याचिकादारांचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ही याचिकाच दंड लावून फेटाळण्यात यावी', असे म्हणणे सीआयडी, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शशांक सांडभोर यांनी प्रतिज्ञापत्रात मांडले आहे.

हेही वाचाः- नालासोपारा तिकीट खिडकीसमोर प्रवाशांची मोठी रांग

या प्रकरणात याचिकादार कंपनीकडून आपल्या वृत्तवाहिन्यांचा वापर हा केवळ मुंबई पोलिस दलाविरोधात सूड उगवण्यासाठी होत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू व पालघर झुंड बळी यांचा काहीच संबंध नसताना तो जोडून जाणीवपूर्वक हा तपास राजकीय हेतूने असल्याचे याचिकादारांकडून वारंवार दाखवले जात आहे. उघडपणे मीडिया ट्रायल करून आणि या प्रकरणात स्वत:च्याच कंपनीला क्लीन चीट देऊन मुंबई पोलिस दलाची बदनामी करण्याचे उद्योग याचिकादार करत आहेत. यामुळे निष्पक्ष तपासातच अडथळे निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत', असे म्हणणे मुंबई पोलिसांनी मांडले आहे. तर पोलिस आयुक्तांनी घेतलेली ती पत्रकार परिषद लक्ष करण्याच्या हेतून केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला. त्यावर उत्तर देताना, संवदेनशील प्रकरणांच्या तपासाविषयी पूर्वीपासून असलेल्या प्रथेप्रमाणेच आपण पत्रकार परिषद घेतली, असे सिंग यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या