Advertisement

गतवर्षी मुंबईतील डेंग्यूचं प्रमाण कमी

मुंबईत कोरोनाच्या साथीदरम्यान मागील वर्षभरात डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षी मुंबईतील डेंग्यूचं प्रमाण कमी
SHARES

मुंबईत कोरोनाच्या साथीदरम्यान मागील वर्षभरात डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२० साली २०१९ च्या तुलनेत यावर्षी डेंग्यूने ग्रस्त लोकांची संख्या ८६ टक्के कमी झाली आहे. कोरोनामुळे इतर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बराच काळ उपचारापासून वंचित राहावे लागले आहे. मात्र, डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करणाऱ्या पालिकेच्या कीटकनाशक विभागाने स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला आहे. 

कोरोनासह साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही पालिकेच्या दवाखाने, आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागानं टोलेजंग इमारती, चाळी, गृहनिर्माण सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये शोधमोहीम राबवून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या तब्बल १ लाख ८ हजार २६ छोट्या-मोठ्या वस्तू तसंच, ५१४ टायर्स संबंधित ठिकाणांहून हटविलं. यामुळं संबंधित भागात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.  

भायखळा (ई विभाग)परिसरातून डासांची उत्पत्तीस्थानं बनू पाहणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १६ हजार ३५५ वस्तू हटविण्यात आल्या. त्याखालोखाल जी-दक्षिणमधून ९ हजार ३५८, ए मधून आठ हजार ३२ वस्तू हटविण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा