Advertisement

नालासोपारा तिकीट खिडकीसमोर प्रवाशांची मोठी रांग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी मार्चपासून बंद झालेली लोकल सेवा सोमवारपासून सुरू झाली आहे.

नालासोपारा तिकीट खिडकीसमोर प्रवाशांची मोठी रांग
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी मार्चपासून बंद झालेली लोकल सेवा सोमवारपासून सुरू झाली आहे. लोकल सुरू झाल्यानं प्रवाशांमध्ये आंनंदाच वातावरण आहे. परंतू, लोकल सेवा सुरू करण्यापूर्वी राज्य सरकार व रेल्वे प्रशासनानं गर्दीचं नियोजन करून लोकल सुरू केली. मात्र, रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

लोकल प्रवासासाठी राज्य सरकारनं विशिष्ट वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. पहिल्याच दिवशी तिकीट खिडकीसमोर मोठी गर्दी जमली होती. सर्वसामन्यांना प्रवास मुभा मिळाली असली तरी रेल्वे स्थानकांतील सुविधांमुळं प्रवाशांची गैरसोय होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये, म्हणून लोकांची गर्दी पाहता, लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यामुळं गेल्या १० महिन्यांपासून लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता, इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्यानं रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती.

सध्यस्थितीत कोरोना नियंत्रणात आल्यानं १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, तसेच दुपारी १२ वाजल्यापासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा