मुंबईत असे कोणतेही पोलिस ठाणे नाही, ज्यात या दोघांवर गुन्हे दाखल नाहीत

मुंबईतल्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांना लुबाडणारे अनेक ठग असतात. मात्र, तुमच्याशी ओळख आहे आपण जुने मित्र आहोत, आठवत नाही का? अश्या गोष्टी सांगून ठगवणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील असे कोणतेही पोलिस ठाणे नाही. ज्यात त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद नाही. मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी ही लोक गेल्या वीस वर्षापासून हे रॅकेट चालवत होते.

 हेही वाचाः-राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले

अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने ही कारवाई केली आणि दोघांनाही ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आल आहे. अटक आरोपींपैकी एकावर मुंबईतल्या ३० पोलीस ठाण्यात तब्बल ८२ गुन्हे दाखल असल्याचे समोर आलं आहे. तर दुसऱ्या आरोपीवर जवळपास ६१ गुन्हे दाखल आहेत. १९९० पासून हे आरोपी हेच काम करत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे इतर ठिकाणी सुद्धा यांचा वावर असल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सूरु आहे. नरेश विजयकुमार जैस्वार, (४०) आणि संजय दत्ताराम मांगडे, (४६) अशी या दोन्ही अटक आरोपींची नाव आहेत. सध्या दोन आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांना टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

हेही वाचाः- coronavirus updates: यंदाची IPL रद्दच करा, केंद्राची BBCI ला सूचना

या पूर्वीहे दोघे गर्दीच्या ठिकाणी उभे राहायचे,  बिस्किट खाऊन ते दुसऱ्याच्या अंगावर टाकायते. त्यानंतर दोघेही त्या व्यक्तीला अंगावरी घाण साफ करण्याच्या नावाखाली आडोशाला घेऊन हात चलाखीने लुटायचे.तर अनेकदा गाडीत बसलेल्या व्यक्तींना हे टार्गेट करायचे. पैसे पडले असल्याचे सांगून गाडीतील व्यक्तीला बाहेर येण्यास बाग पाडून त्यांचे लक्ष विचलित करून गाडीतील मौल्यवान वस्तू लंपास करायचे. या दोघांसारखे अनेक सराईत आरोपी मुंबईत आहेत. अशा चोरांच्या मुस्क्या कायमस्वरूपी आवळण्यासाठीच मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी अशा आरोपींना एमपीओडीच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.ज्याने करून अशा चोरांना जामीन मिळणे मुश्किल होऊन ते जास्तीत जास्त वेळ तुरुंगात राहतील.  

पुढील बातमी
इतर बातम्या