Advertisement

coronavirus updates: यंदाची IPL रद्दच करा, केंद्राची BBCI ला सूचना

'करोना' व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन यावर्षी इंडियन प्रीमियर लिग (IPL) स्पर्धा खेळवू नका, असा सल्ला केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दिला आहे. मात्र यावर अंतिम निर्णय आता बीसीसीआयलाच घ्यायचा आहे.

coronavirus updates: यंदाची IPL रद्दच करा, केंद्राची BBCI ला सूचना
SHARES

'करोना' व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन यावर्षी इंडियन प्रीमियर लिग (IPL) स्पर्धा खेळवू नका, असा सल्ला केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दिला आहे. मात्र यावर अंतिम निर्णय आता बीसीसीआयलाच घ्यायचा आहे. 

हेही वाचा - आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चर्चा

'करोना' व्हायरसचे (Coronavirus patient) रुग्ण वाढत असल्याने भारतातही आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्र सरकारने गर्दी टाळण्यासाठी सभा, संमेलने, कार्यक्रम, स्पर्धा आयोजित न करण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा स्थितीतच कर्नाटकच्या कलबुर्गी येथील एका ७६ वर्षीय रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८७ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात करोनाचे नवे रुग्ण आढळन आले आहेत. या पार्श्वभूमीवर २९ तारखेपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा सल्ला केंद्र सरकारने बीसीसीआयला दिला आहे.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (external affairs ministery) बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. आयपीएलच्या आयोजनाचे अधिकार आयपीएल प्रशासकीय समितीकडे असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय  आयपीएलच्या (IPL) प्रशासकीय समितीवर सोपवण्यात आला आहे. आयपीएलच्या प्रशासकीय समितीची महत्वाची बैठक या आठवड्याच्या अखेरीस होणार आहे. या बैठकीत आयपीएल स्पर्धा घ्यायची, पुढं ढकलायची की रद्द करायची यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा - मुंबई इंडियन्सचे सामने होणार महाराष्ट्राबाहेर?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, कोरोनाच्या धोक्यामुळे यावर्षी आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येऊ नये, असा सल्ला आम्ही बीसीसीआयला (BCCI) दिला आहे. अंतिम निर्णय आयपीएलच्या (IPL) प्रशासकीय समितीवर सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकार १५ एप्रिलपर्यंत कुठल्याही परदेशी खेळाडूंना व्हिसा देणार नाही. शिवाय बीसीआयला आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेता येईल. 

प्रेक्षकांशिवाय आयपीएल खेळवण्याच्या केंद्राच्या सूचनेला आयपीएल संघ मालकांनी होकार दर्शवलेला असला, तरी अद्याप बीसीसीआयने अजून यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा