Advertisement

मुंबई इंडियन्सचे सामने होणार महाराष्ट्राबाहेर?

ठाकरे सरकारच्या विचाराधीन असलेल्या निर्णयामुळं मुंबईकरांच्या आनंदावर पाणी फिरू शकते.

मुंबई इंडियन्सचे सामने होणार महाराष्ट्राबाहेर?
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १३ हंगामाला काही दिवसातच सुरूवात होणार आहे. बीसीसीआयनं (BCCI) घोषित केल्यानुसार आयपीएलचा पहिला सामाना मुबई इंडियन्स (Mumbai Indians) व चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे. मात्र, यंदा आयपीएलवर कोरोना व्हायरसचं (Corona Virus) सावट येण्याची शक्यता असल्यानं सामने पुढे ढकलण्याची शक्यता आहे. तसंच, ठाकरे सरकारच्या विचाराधीन असलेल्या निर्णयामुळं मुंबईकरांच्या आनंदावर पाणी फिरू शकते.

आयपीएल २०२०चा (IPL 2020) पहिला सामना वानखेडेवर होणार ही घोषणा झाल्यापासून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, आयपीएल पुढे ढकलायची की नाही याबाबत महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) विचार करत असल्याची माहिती, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावरून आयपीएल २०२०च्या जेतेपदाच्या शर्यतीचा श्रीगणेशा करणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स हैदराबादला सनरायझर्स हैदराबादचा सामना करण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स पुन्हा ५ एप्रिलला घरच्या मैदानावर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूशी मुकाबला करणार आहे. त्यानंतर संघ किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स असे २ सामने खेळणार आहे.

आयपीएलची ४ जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध परतीचा सामना खेळण्यासाठी चेपॉकला रवाना होणार आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या बर्थ डेला म्हणजेच २४ एप्रिलला हा सामना होणार आहे. २०१२ आणि २०१४ च्या आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स २८ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर सामना करणार आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स १ मे रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्सशी भिडतील. मुंबई आणि दिल्ली यांच्यात ६ मे रोजी परतीचा सामना होईल. सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ९ मे रोजी परतीचा सामना होणार आहे.

मोठ्या संख्येनं लोकं जिथं जमतात तेथे कोरोना व्हायरससारख्या संक्रामक रोगचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. अशा स्पर्धा नंतरही आयोजित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आयपीएल पुढे ढकलावी की नाही, यावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

मनसेचे शॅडो कॅबिनेट तयार?

पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा