Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण

मागील ४ दिवस सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण
SHARES

मुंबईसह राज्यभरातील वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील ४ दिवस सलग पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं (Indian Oil Corporation) दिलेल्या माहितीनुसार प्रतिलिटर पेट्रोल (Petrol) २४ पैशांनी तर डिझेल (Diesel) २६ पैशांनी स्वस्त झाले आहे.

मुंबईत प्रति लिटर डिझेलचा दर ६६.२४ पैसे तर दिल्लीत ६३.२६ पैसे आहे. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल ७६.२९ पैसे तर दिल्लीत ७०.५९ पैसे आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील (International Oil Market) दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज बदल होत असतात.

रशिया विरोधात सौदी अरेबियानं दर युद्ध सुरु केलं आहे. त्यामुळं तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. अमेरिकेत तेलाचं दर २७ टक्क्यांनी कोसळलं आहेत. महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट वाढवण्यात आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर एक रुपयांनी वाढणार आहेत.

कच्चा तेलाचा दर प्रतिपिंप ३२ डॉलरपर्यंत कोसळला आहे. तेच ब्रेन्ट क्रूड ऑइलच्या दरात २२ टक्के घसरण झाली आहे. प्रतिपिंप ब्रेन्ट क्रूड ऑइल दर ३५ डॉलर आहे. १९९१ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात इतकी मोठी घसरण झाली आहे.



हेही वाचा -

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय 'एन ९५ मास्क'ची विक्री नाही

मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा