Advertisement

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय 'एन ९५ मास्क'ची विक्री नाही

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने ‘एन ९५ मास्क’च्या विक्रीवर निर्बंध आणलं आहेत.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय 'एन ९५ मास्क'ची विक्री नाही
SHARES

मुंबईसह जगभरातील नागरिकांमध्ये भयंकर अशा कोरोना व्हायरसची (Corona Virus) चर्चा सुरू आहे. सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तसंच, कोरोना व्हायरस संसर्गजन्य (Viral) असल्या योग्यती खबरदारी घेतली जात आहे. परंतु, कोरोना व्हायरसचा धोका मुंबईला (Mumbai) नसला तरी सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिक तोंडाला मास्क लावत आहेत तसंच, हात सॅनिटायझरनं स्वच्छ करत आहेत. त्यामुुळं मास्क (Mask) आणि सॅनिटायझरची (Sanitizer) मागणी अचानक वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. तुटवढा निर्माण झाल्यानं औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) यांची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘एन ९५ मास्क’च्या विक्रीवर निर्बंध आणलं आहेत. मास्क आणि सॅनिटायझरची मागणी अचानक वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. ‘एन ९५ मास्क’सह एकदा वापरून फेकण्याचे ‘मास्क’ही दुप्पट किमतीनं विकण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी ‘एन ९५ मास्क’ हे वैद्यक क्षेत्रातील कर्मचारी वापरत असलेले मास्क आणि ‘पीपीई’चा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

केवळ डॉक्टरांची (Doctor) चिठ्ठी असेल तरच त्यांची विक्री करण्याचे आदेश औषध प्रशासनानं काढले आहेत. मास्कची साठेबाजी होऊ नये यासाठी प्रशासनाचे अधिकारी औषध दुकानांना भेटी देत आहेत. असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळते. र्निजतुकीकरणासाठी साबणानं हात धुणं हाच योग्य पर्याय आहे.

कोरोना व्हायरसच वाढता प्रभाव पाहता मुंबई विमानतळावर, मेट्रो १ मार्गावरील स्थानकातील परिसर स्वच्छ ठेवण्यात येत आहे. अशातच रेल्वे व एसटी प्रशासन देखील सज्ज झाला आहे. आजारापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकातील उद्घोषणा यंत्रणेतून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, खोकताना-शिंकताना तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवा, वापरण्यात आलेले टिश्यू पेपर त्वरीत बंद कचऱ्यांच्या डब्यात टाका असे संदेश देण्यात येत आहे. रेल्वेच्या रुग्णालयांना देखील पूर्णपणे सज्ज राहण्याचे आदेश रेल्वे मंडळाकडून देण्यात आले आहे.



हेही वाचा -

मेट्रोनंतर रेल्वे-एसटी करोनासाठी सज्ज

मोबाइलच्या टॉर्चमुळं गेला कामगाराचा मृत्यू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा