मोबाइलच्या टॉर्चमुळं कामगाराचा झाला मृत्यू

मालाड पूर्वेतील पठाणवाडीमध्ये झालेल्या हाणामारीत एका कामगाराचा (Worker) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोबाइलच्या टॉर्चमुळं कामगाराचा झाला मृत्यू
SHARES

मालाड पूर्वेतील पठाणवाडीमध्ये झालेल्या हाणामारीत एका कामगाराचा (Worker) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नव्या इमारतीचं काम सुरू असताना एका कामगाराच्या मोबाइलमधील टॉर्चचा प्रकाश अन्य कामगाराच्या चेहऱ्यावर २ वेळा पडला. त्यामुळं त्या कामगारानं हातात मोबाइल (Mobile) असलेल्या कामगाराला ढकललं. यावेळी त्या कामगाराचा तोल गेल्यानं लिफ्टच्या (Lift) डक्टमधून सरळ तळमजल्यावर कोसळला व तिथचं त्याचा मृत्यू झाल्याचं समजतं.

अभिचंद्र यादव (२४) व अभिषेक चौहान (२४) अशी या कामगारांची नावं असून, अभिचंद्र यादव मोबाईलचा टॉर्चचा (Mobile Torch) प्रकाश चेहऱ्यावर पडल्यानं अभिषेक चौहान याला ढकललं. त्यामुळं अभिषेक चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमधून कोसळला. या घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी (Kurar Police) घटनास्थळी धाव घेत अभिचंद्रला अटक केल्याची माहिती मिळते.

पठाणवाडीतील नव्यानं बांधल्या जाणाऱ्या संकुलात कामगारांचा वावर असून, इथं ६ विंग बांधल्या जात आहेत. तसंच, त्यांचं काम जोरात सुरू आहे. संपूर्ण इमारत उभ्या राहिल्या नसल्यानं तिथं कामगारांसाठी तात्पुरती घरे बांधली आहेत. छोट्या भिंती, पडदे बांधून या खोल्या तयार केल्या आहेत. इमारतींत स्लॅबचं काम सुरू असल्यानं अद्याप तिथल्या मजल्यांवर विजेची सुविधा नाही. त्यामुळं कामगारांना टॉर्च वा मोबाइलमधील टॉर्चचं सहाय्य घ्यावे लागते.

शुक्रवारी रात्री तपोवन इमारतीत कामासाठी चौथ्या मजल्यावर पोहोचलेल्या अभिषेकच्या मोबाइलमधील टॉर्चचा प्रकाश अभिचंद्रच्या चेहऱ्यावर पडला. त्यानंतर अभिषेक त्याच इमारतीत खाली उतरून पुन्हा चालत चौथ्या मजल्यावर पोहोचला. तेव्हादेखील मोबाइलमधील टॉर्चचा प्रकाश अभिचंद्रच्या चेहऱ्यावर पडल्याने वाद सुरू झाला. हा प्रकार मुद्दाम केल्याचा आरोप करत अभिचंद्रने अभिषेकला मारहाण सुरू केली आणि ढकलून दिले. तेव्हा तोल सुटलेला अभिषेक बाजूलाच लिफ्टसाठी असलेल्या मोकळ्या जागेतून तळमजल्यावर कोसळला.



हेही वाचा -

मेट्रोनंतर रेल्वे-एसटी करोनासाठी सज्ज

Women's Day Special : महिलांसाठी आरोग्य विमा का आवश्यक ?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा