Advertisement

Women's Day Special : महिलांसाठी आरोग्य विमा का आवश्यक ?

महिलांना विमा (insurance) का आवश्यक आहे याबद्दल मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर सपना देसाई सांगत आहेत.

Women's Day Special : महिलांसाठी आरोग्य विमा का आवश्यक ?
SHARES

महिलांचा (women) गौरव करण्यासाठी, त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रांतील यश साजरे करण्यासाठी आणि समाजामध्ये त्या देत असलेल्या लक्षणीय योगदानाची यशाची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या साजरीकरणाची मध्यवर्ती कल्पना आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day ) 2020 'कलेक्टिव्ह इंडिव्हिज्युअलिझम’ (Collective Individualism) या संकल्पनेवर आधारित असून, #इचफॉरइक्वल (each for equal) चे उद्दिष्ट महिलांना स्वतःबद्दलच्या प्राधान्याच्या गोष्टी ओळखण्यासाठी मदत करणे आणि त्यांचे जीवन उंचावणे हे आहे. त्यांच्यासाठी एक सर्वात महत्त्वाचे प्राधान्य म्हणजे, विमा (insurance-इन्शुरन्स) बद्दल जागरुकता. महिलांना विमा (insurance) का आवश्यक आहे याबद्दल मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर सपना देसाई सांगत आहेत.

कुटुंबाच्या कल्याणासाठी महिला नेहमी प्रचंड योगदान देतात. असं करत असताना त्या स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतात. दुर्दैवाने, इन्शुरन्सच्या बाबतीत स्त्रिया स्वतःला फार कमी लेखतात आणि इन्शुरन्समुळे आयुष्यातल्या अनेक धोक्यांपासून मिळणारे आर्थिक संरक्षण त्या घेत नाहीत. आर्थिक निर्णय घेण्याच्या बाबतीत साधारणपणे स्त्रिया काहीशा विलंबानेच निर्णय घेताना दिसतात. घर आणि ऑफिस सांभाळण्यासाठी त्यांची इतकी कसरत होत असते की अनेकदा त्या स्वतःला विसरूनच जातात.

महिलांचा विचार करणं का गरजेचंचे आरोग्याचे प्रश्न पुरुषांच्या समस्यांपेक्षा वेगळे असतात आणि या समस्यांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने फार कमी महिला स्वतःच्या आरोग्याला महत्त्व देतात. मणिपालसिग्नाच्या ३६० वेल-बीइंग सर्व्हेच्या मते, ७९ टक्के महिलांना ताणतणावाचा त्रास होतो. महिलांच्या हेल्थ इन्शुरन्सविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी इन्शुरन्स कंपन्यांनी अखेरीस गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अर्थ्रायटिस (Arthritis), डायबिटिस (diabetes), बीपी ( BP) आदी आजारांबाबत आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) नियोजनाकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही आणि हे नियोजन शक्य तितक्या लवकर करावे.

पुरुषांना हृदयाशी संबंधित विकारांचा धोका अधिक असतो असं म्हटलं जाते. परंतु, प्रत्यक्षात हृदयाशी संबंधित विशिष्ट विकार केवळ महिलांना होतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरणारे कोरोनरी आर्टरी डिसिज होण्याची शक्यता वाढते. साधारणतः पुरुषांच्या हृदयाच्या आकाराच्या तुलनेत महिलांच्या हृदयाचा आकार कमी असतो. महिलांना ३५ व्या वर्षी म्हणजे इतक्या लहान वयातही हृदयाच्या विकारांचा धोका संभवतो असं आढळून येतं.

डिसऑर्डर्ड स्लीप-वेक सायकल, महिलांचे गरोदरपणाचे वाढलेले सरासरी वय अशा अनेक कारणांमुळे जीवनशैलीशी संबंधित असलेल्या समस्या वाढत असल्याने जेस्टेशनल डायबिटीजच्या केसेसची संख्या आगामी काळात लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आजाराचा फटका जगभरातील लाखो महिलांना बसत आहे आणि त्या बाबतीत भारतातील महिलाही मागे नाहीत. भारतातील जेस्टेशनल डायबिटिस मेलिटस असणाऱ्या असंख्य महिलांना बाळाला जन्म दिल्यानंतर काहीच वर्षांमध्ये टाइप-२ डायबिटिस होण्याचा धोका निर्माण होतो. टाइप-२ डायबिटिस हा जगातील झपाट्याने वाढता क्रोनिक आजार आहे.

काम आणि घरातल्या जबाबदाऱ्या यांची सांगड घालत असताना नोकरी करणाऱ्या महिलांना कमालीचा ताण सहन करावा लागतो. केवळ ६७ टक्के नोकरी करणाऱ्या महिला वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रॅममध्ये सहभागी होतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यातून गंभीर आजार जडू शकतात. कॅन्सरशी संबंधित आजार बरे करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. यामुळे बरीचशी बचत खर्ची पडू शकते. महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये साधारणतः एंडोमेट्रिअल, ब्रेस्ट, कोलन, कर्व्हिकल, त्वचा व ओव्हरिअन कॅन्सर यांचा समावेश असतो. भारतामध्ये, दरवर्षी जवळजवळ पाच लाखांहून अधिक लोक कॅन्सरमुळे दगावतात.

भारतीय शहरांत राहणाऱ्या आधुनिक महिलांना वेळ, वाहतूक व सहकारी यांच्याशी संघर्ष करावा लागतो आहे. घर आणि काम अशा दोन्ही पूर्णतः वेगळ्या ठिकाणी कसरत करावी लागते आहे. यामुळे त्यांचे दैनंदिन वेळापत्रक अत्यंत तणावपूर्ण, आरोग्याकडे कमी लक्ष देणारे असते. परिणामी, अधिकाधिक संख्येने महिलांना गर्भधारणा होणे अशक्य ठरणे किंवा वंध्यत्व असा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. योग्य पोषणाचा अभाव, ग्रामीण भागात अपुऱ्या असणाऱ्या आरोग्य सेवा, स्वच्छता, लैंगिक शिक्षण व वाहतूक सुविधा या कारणांमुळे भारतीय महिलांचे प्रजननविषयक आरोग्य जागतिक सरासरीपेक्षा खाली आहे.

या आजारांची तीव्रता व वेग सातत्याने वाढतो आहे. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आरोग्याचे नियंत्रण आता स्वतःच्या हातात घेणे आवश्यक ठरते आहे. त्यासाठी त्यांनी एकंदर आरोग्याच्या दृष्टीने योग्य वेळी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जीवनशैलीमध्ये झालेले प्रतिकूल बदल आरोग्याला घातक ठरतात, परंतु थोडी काळजी व सावधगिरी बाळगून त्यांचे नीट व्यवस्थापन केले तर यामध्ये बदल घडवून आणणे शक्य आहे. यासाठी, वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मदत मिळण्यासाठी आर्थिक कवच अतिशय उपयुक्त ठरू शकते.

कोणीही आधी नियोजन करून आजारी पडत नाही. पण आजारपण आल्यास आर्थिक तयारी ठेवण्याच्या हेतूने आर्थिक पैलूचा विचार नक्कीच करू शकतो. त्यामुळे उत्तम आरोग्यसेवा आयुष्यभर मिळण्याची खात्री करण्यासाठी, दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांना संरक्षण देण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी महिलांनी धोक्याची घंटा वाजण्यापूर्वी स्वतःकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण, त्यांच्यावर कुटुंबाचीही जबाबदारी आहे. म्हणूनच, यंदा महिला दिनी, स्वतःकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाका आणि हेल्थ इन्शुरन्स प्लान निवडा. #इचफॉरइक्वल (each for equal) च्या दिशेने हा पहिला टप्पा आहे.

महिलांनो, स्वतःमध्ये गुंतवणूक करा!हेही वाचा  -

५ लाख गुंतवणुकीवर मिळतील ७.२५ लाख, 'अशी' आहे पोस्टाची स्कीम

CREDIT CARD हॅक झाल्यास तात्काळ करा 'हे' काम, परत मिळतील पूर्ण पैसे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा