Advertisement

CREDIT CARD हॅक झाल्यास तात्काळ करा 'हे' काम, परत मिळतील पूर्ण पैसे

क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅक झाल्यानंतर काय करायला हवे याची माहिती अनेकांना नसते. ही माहिती प्रत्येकाने घेणंं आवश्यक आहे.

CREDIT CARD हॅक झाल्यास तात्काळ करा 'हे' काम, परत मिळतील पूर्ण पैसे
SHARES
Advertisement

क्रेडिट कार्ड (CREDIT CARD)आणि डेबिट कार्ड (DEBIT CARD) हॅकिंग (Hacking) चे दररोज नवीन मार्ग समोर येत आहेत. सामान्यत: काही विश्वासार्ह नसलेल्या वेबसाईटवरून खरेदी करताना कार्ड हॅकिंग होतं. यावेळी तुमची गोपनीय माहिती लीक होते. यावेळी  आपल्याशी संबंधित गोपनीय माहिती लीक केली जाते. या व्यतिरिक्त, मेल (MAIL) आणि अॅप्सवरून मालिसेज सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतरही आपल्या सिस्टम किंवा मोबाइल फोनवरून डेटा लीक केला जाऊ शकतो. अशा माहितीच्या मदतीने हॅकर्स आपले कार्ड हॅक करतात आणि पैसे कमवतात.  क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅक झाल्यानंतर काय करायला हवे याची माहिती अनेकांना नसते. ही माहिती प्रत्येकाने घेणंं आवश्यक आहे. 

 क्रेडिट कार्ड हॅक झाल्यास काय करावे?

१) बँकेला माहिती द्या

आपण हॅकिंगचे बळी ठरल्यास किंवा आपल्या बँक खात्यात किंवा कार्ड स्टेटमेंटमधील कोणत्याही अनधिकृत व्यवहाराबद्दल आपल्याला माहिती झाल्यास आपण त्वरित बँकेला कळवावे. सर्व बँका किंवा कार्ड कंपन्यांच्या ग्राहक सेवा हेल्पलाइन क्रमांक २४ तास खुले असतात. हेल्पलाइन क्रमांक कार्डच्या मागील बाजूस दिले जातात किंवा आपण ते वेबसाइटवरून मिळवू शकतो. जितक्या लवकर आपण बँकेला माहिती द्याल तितक्या लवकर तुमची समस्या सोडवण्यास सुरूवात होईल.

२. कार्ड ब्लॉक केल्याची खात्री करा

हॅकिंगच्या तक्रारींवर बँक ताबडतोब कार्ड ब्लाॅक करतात. मात्र, कस्टमर केअरला काॅल करून कार्ड ब्लाॅक केले किंवा नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. आपली वैयक्तिक माहिती लीक झाल्यास कार्ड रद्द करणंच योग्य आहे.  बँक आपल्याला नवीन कार्ड पाठवेल, परंतु आपल्याला कदाचित एक किंवा दोन आठवडे थांबावे लागेल.

३) मेल पाठवल्याची खात्री करा

आर्थिक फसवणूकीच्या संदर्भात बँकेशी संपर्क केल्याचा संदर्भ क्रमांक आपल्याजवळ जपून ठेवा.  हेल्पलाईन नंबरवर झालेल्या संवादाची माहिती कस्टमर केअर मेल आयडीला पाठवा. फसव्या व्यवहाराचे सर्व पुरावे ठेवा, जसे की स्क्रीनशॉट्स, स्टेटमेंट कॉपी, ईमेल किंवा अ‍ॅलर्ट.

४) नुकसानीसाठी अर्ज करा

 जर या हॅकिंगमध्ये तुमचे आर्थिक नुकसान झाले तर काही परिस्थितीत  बँकेद्वारे परतफेड केली जाईल. मात्र, जर आपण माहिती देण्यास ३ दिवसांपेक्षा अधिक विलंब केल्यास आपल्याला नुकसानीची संपूर्ण रक्कम किंवा बँकेच्या धोरणानुसार ठरवलेली रक्कम जमा करावी लागेल. जर आपण कोणतीही चूक केली नसेल आणि आपण ३ दिवसांच्या आत बँकेला माहिती दिली असेल तर बँक आरबीआयच्या नियमांनुसार या व्यवहाराची चौकशी करेल. या प्रक्रियेस १२० दिवस लागतात. या दरम्यान नुकसानीची आपल्याला पूर्णपणे भरपाई मिळेल. पैसे मिळवण्यासाठी आपल्याला संपूर्ण प्रक्रिया पाळावी लागेल. मात्र, तपासात आपली चूक आढळल्यास नुकसानीचा संपूर्ण भार आपल्याला सहन करावा लागेल.


डेबिट कार्ड हॅक झाल्यास काय करावे?

१) डेबिट कार्ड हॅक झाले असेल तर प्रथम कस्टमर केअरला काॅल करून कार्ड ब्लाॅक करून बँकेला याची माहिती द्या. कार्ड हरवल्यानंतरही आपल्याला हेच करावे लागेल. 

 २) बँकेच्या कस्टमर केअरला  कॉल करा आणि तुमच्या कार्डाच्या सर्व सेवा त्वरित बंद करा.

 ३) ज्या बँकेचं एटीएम आहे त्या बँकेत जाऊन  नवीन कार्डसाठी अर्ज करा. आपल्याला कार्ड हरवल्याची एफआयआरही नोंदवावी लागेल. एफआयआर मागणी बँकेकडून केली जाऊ शकते.

४) आपण नेट बँकिंग वापरत असल्यास खात्याचा पासवर्ड बदला. शक्य असल्यास खात्यात जमा केलेली रक्कम नेट बँकिंगद्वारे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करा. हेही वाचा -

७-८ पट वाढेल मोबाईल डेटाचे दर, १ एप्रिलपासून नवे दर होणार लागू

आता SBI चं लॉकर वापरण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसेसंबंधित विषय
Advertisement