Advertisement

७-८ पट वाढेल मोबाईल डेटाचे दर, १ एप्रिलपासून नवे दर होणार लागू

नवे दर १ एप्रिलपासून लागू केले जावेत. जेणेकरून त्यांचा थकीत भरणा (AGR) भरून निघेल आणि त्यांचा व्यवसाय चालू होईल.

७-८ पट वाढेल मोबाईल डेटाचे दर, १ एप्रिलपासून नवे दर होणार लागू
SHARES

स्मार्टफोन वापरणाऱ्यांना येत्या काळात मोबाइल डेटा आणि कॉलिंग सेवांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण व्होडाफोन आणि आयडिया या दूरसंचार कंपनीनं मोबाइल डेटासाठी किमान दर वाढवून ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या दरापेक्षा हे दर ७-८ पट अधिक आहे.

...तर थकबाकी वसूल होईल

कंपनीनं मासिक शुल्कासह कॉल सर्व्हिसेससाठी प्रति मिनिट ६ पैसे दराची मागणी केली आहे. सध्या मोबाईल डेटा दर प्रति जीबी ४-५ रुपये आहेत. कंपनीनं म्हटलं आहे की, हे नवे दर १ एप्रिलपासून लागू केले जावेत. जेणेकरून त्यांचा थकीत भरणा (AGR) भरून निघेल आणि त्यांचा व्यवसाय चांगला चालेल. परंतु, या मागण्या अत्यंत कठीण आहेत आणि या मागण्या मान्य करणं सरकारसाठी मोठी समस्या आहे.

व्होडाफोन-आयडिया तोट्यात?

व्होडाफोन आयडियाकडून तीन महिन्यांत कॉल आणि इंटरनेट दर वाढवण्याची मागणी केली गेली आहे. या काळात कंपनीनं किंमतींमध्ये ५० टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मोबाईल कॉल आणि डेटा दरात वाढ केल्यानंतर ते थकबाकी चुकवू शकतात. व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्यांनी २०१५-१६ या साली दर वाढवूनच थकबाकी दिली होती. त्यावेळी आयडिया आणि व्होडाफोन या दोन वेगवेगळ्या कंपन्या होत्या.

३ महिन्यांत ५० टक्के दरवाढ

५३ हजार कोटींचा थकबाकी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, व्होडाफोन-आयडियावर सुमारे ५३ हजार कोटींची थकबाकी (AGR) आहे. कंपनीनं आतापर्यंत दूरसंचार विभागाला केवळ ३ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत. कंपनीची अशी इच्छा आहे की, १ एप्रिल २०२० पासून मोबाइल डेटासाठी कमीतकमी ३५ रुपये प्रति गीगाबाईट (जीबी) आणि किमान मासिक कनेक्शन ५० रुपये निश्चित करावी

आता सरकार ही मागणी मान्य करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जर सरकारनं ही मागणी मान्य केली तर आयडिया-व्होडाफोनची थकबाकी चुकेल. पण सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागेल हे तितकंच खरं.

हेही वाचा

आता SBI चं लॉकर वापरण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

१ एप्रिलपासून होणार BS-6 पेट्रोल-डिझेलची विक्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा