Advertisement

१ एप्रिलपासून होणार BS-6 पेट्रोल-डिझेलची विक्री

१ एप्रिलपासून बीएस-६ सुसंगत इंधन पुरवठा सुरू होईल. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी)च्या वरिष्ठ अधिका्यानं ही माहिती दिली.

१ एप्रिलपासून होणार BS-6 पेट्रोल-डिझेलची विक्री
SHARES

भारत आता कमी प्रदूषण करणारं स्वच्छ पेट्रोल-डिझेलचा वापर करण्यास पूर्णपणे तयार आहे. १ एप्रिलपासून  बीएस-६ सुसंगत इंधन पुरवठा सुरू होईल. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी)च्या वरिष्ठ अधिका्यानं ही माहिती दिली.

वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी भारतानं थेट बीएस-४ पासून बीएस-६ मानक लागू करण्याचा निर्णय घेतला होता. आता अवघ्या ३ वर्षात याची अंमलबजावणी होणार आहे. त्याद्वारे भारत त्या निवडक देशांमध्ये सामील होईल, जिथे स्वच्छ पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो.

इंडियन ऑईलचे चेअरमन संजीव सिंह म्हणाले की, जवळपास सर्व रिफायनरीजनी २०१९ च्या अखेरीस बीएस-६ या तंत्रज्ञानाशी अनुरूप पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन सुरू केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचा एक एक थेंब देशातील बीएस-६ मानक इंधनातून हस्तांतरित करण्यासाठी आता पेट्रोलियम कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे


नवीन इंधन डेपोमध्ये पोहोचवले

सिंह म्हणाले, १ एप्रिलपासून आम्ही बीएस-६ इंधन पुरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. जवळपास सर्व रिफायनरीज प्रकल्पांनी बीएस-६ इंधनपुरवठा सुरू केला आहे. हे इंधन देशभरात डेपोमध्ये पोहोचवण्यात देखील आलं आहे. आता १ एप्रिलपासून पेट्रोल पंपांवर फक्त बीएस-६ मानक पेट्रोल-डिझेलची विक्री होईल.


२०१० मध्ये भारतानं बीएस-३ उत्सर्जनाचं मानक स्वीकारलं होतं. बीएस-३ वरून बीएस-४ वर पोहोचण्यास देशाला सात वर्षं लागली. नवीन रिफायनरी कंपन्यांनी नवीन मानकांना अनुसरून इंधन तयार करण्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बीएस-६ सुसंगत पेट्रोल आणि डिझेलमध्ये सल्फरचे प्रमाण केवळ १० पीपीएम आहे. ते सीएनजीप्रमाणे स्वच्छ मानले जाते.


डिझेल कारमुळे प्रदूषण घटेल

सिंह म्हणाले की, नवीन इंधनामुळे बीएस-६ सुसंगत वाहनांमधील नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन पेट्रोल कारमध्ये २५ टक्के आणि डिझेल कारमध्ये ७० टक्क्यांपर्यंत कमी होईल. दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये स्वच्छ इंधनाचा पुरवठा एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ववत होईल अशी योजना होती. एप्रिल २०२० पासून देशभरात पुरवठा सुरू होईल. तथापि, कंपन्यांनी दिल्ली-एनसीआरमध्ये १ एप्रिल २०१८ पासून नवीन मानकांनानुसार इंधन पुरवठा सुरू केला. यानंतर १ एप्रिल २०१९ पासून आग्रा जिल्ह्यात स्वच्छ इंधनाचा पुरवठा सुरू करण्यात आला. त्यात राजस्थानचे चार जिल्हे आणि उत्तर प्रदेशातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर २०१९ पासून हरियाणाच्या ७ जिल्ह्यांमध्ये हे इंधन उपलब्ध झाली.

बीएस ६  म्हणजे काय?

आतापर्यंत भारतात बीएस-४ इंजिन वापरले जात होते. पण यापुढे बीएस-६ हे इंजिन वापरण्यात येणार आहे. बीएस -४ मधील इंधनात सल्फरचे प्रमाण प्रतिकिलो ५० मिलीग्राम असायचं आता बीएस-६ मध्ये १० मिलिग्राम असेल.

बीएस-४च्या तुलनेत बीएस-६मध्ये नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन पेट्रोल इंजिनमध्ये २५ टक्के आणि डिझेल इंजिनमध्ये ६८ टक्के कमी असेल. डिझेल इंजिनमधील पर्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण ८२ टक्क्यांनी कमी असेल. तसंच पर्टिक्युलेट मॅटरच्या नियंत्रणासाठी डायरेक्ट इंजेक्शनवाल्या पेट्रोल इंजिनला पहिल्यांदाच या मापदंडांत आणलं गेलं आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र जीएसटी रिटर्न भरण्यात अव्वल

ATM च्या वापरावर मोजावे लागू शकतात जादा शुल्क

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा