Advertisement

ATM च्या वापरावर मोजावे लागू शकतात जादा शुल्क


ATM च्या वापरावर मोजावे लागू शकतात जादा शुल्क
SHARES

ATM च्या वापरावर लवकरच जादा शुल्क मोजावं लागू शकतं. भारतीय ATM ऑपरेटर्स असोसिएशननं रिझर्व बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank of India) एक पत्र लिहिलं आहे. त्याद्वारे त्यांनी ATMमधून पैसे काढण्यावर इंटरचेंज शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे.

शुल्कवाढीची मागणी का?

ATM ऑपरेटर्स असोसिएशनचं म्हणणं आहे की, जर आरबीआयनं या शुल्कवाढीला मंजुरी दिली नाही तर त्यांच्या व्यवसायावर याचा विपरित परिणाम होईल. खासकरून याचा परिणाम नवीन ATM मशिन बसवण्यावर होणार आहे. देशात ATM मशिनची संख्या वाढवण्यासाठी अजुनही प्रयत्न सुरू आहेत.

असोसिएशननं हे ही म्हटलंय की, खर्च वाढला आणि महसूल तेवढाच राहिल्यामुळे फक्त ATM व्यवसायावर परिणाम होत होतोच आहे. शिवाय नव्या एटीएमच्या उभारणीला सुद्ध अडचणी येत आहेत.

RBI नं ATM ची सुरक्षा आणि देखभालीच्या दर्जामध्ये वाढ केलीय. RBI च्या या निर्णयानंतर सर्व ATM मशिनची सुरक्षा आणि देखभालीचा खर्च पहिल्यापेक्षा वाढला आहे. याच्या उलट ATM ची सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे.


किती फी आकारली जाते?

सध्या भारतीय रिझर्व बँकेकडून ATM मधील इंटरचेंज फी ही प्रति ट्राम्झॅक्शन १५ रुपये ठेवण्यात आलीय. हा चार्ज प्रति ग्राहक प्रति महिना ५ ट्रांझेक्शननंतर लागू होतो. याच चार्जबद्दल कॉनफेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (CATMi) नं म्हटलं आहे की, ATM मशिनच्या डेली ऑपरेशनसाठी हे शुल्क पेरसं नाही.


शुल्कवाढीसाठी समितीची स्थापना

या शुल्कवाढीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी RBI नं मागील वर्षी एका उच्चस्तरिय समितीची स्थापना केली आहे. देशभरातील ATM मशिनची संख्या कशी वाढवली जाईल आणि दुर्गम भागांमध्ये ATMची संख्या कशी वाढले याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या समितीनं आपला रिपोर्ट RBI कडे सोपवला आहे. ६ सदस्यांच्या या समितीनं केलेल्या शिफारसीनुसार इंटरचेंज फी वाढवण्यात यावी.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा