Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

आता SBI चं लॉकर वापरण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

नवीन शुल्क पद्धती ३१ मार्चपासून लागू होणार आहे. कसे आहेत नवे दर? जाणून घ्या

आता SBI चं लॉकर वापरण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
SHARES

एसबीआय (SBI)चं लॉकर वापरण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण देशातील सर्वात मोठ्या बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियानं सुरक्षित जमा लॉकरचं (Safe Deposit Lockers) शुल्क वाढवलं आहे. नवीन शुल्क पद्धती ३१ मार्चपासून लागू होणार आहे. यानंतर एसबीआयच्या लॉकर्सचं वार्षिक भाडं किमान ५०० रुपयांनी वाढेल. त्यामुळे SBI ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.


कितीनं वाढणार?

SBI च्या छोट्या लॉकरसाठी आकारण्यात येणारं शुल्क ५०० ते २००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. तर एक्स्ट्रा लॉकरचं वार्षिक शुल्क ९००० होतं, ते आता १२ हजारपर्यंत वाढवण्यात आलं आहे.


SBI चं लॉकर महागलं

SBI चा मीडियम लॉकर आत १ हजांरावरून ४ हजारांपर्यंत महागला आहे. तर मोठ्या लॉकरची किंमत २ हजार ते ८ हजार रुपये असेल. हे नवीन दर केवळ मेट्रोसिटी आणि शहरी भागात लागू होतील. यामध्ये GST चा समावेश नाही आहे. SBI शाखा छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात स्वस्त दरात ही सेवा पुरवतात. याठिकाणी लॉकर्सच्या किंमती १ हजार ५०० पासून ९ हजार रुपयांपर्यंत आहेत.


लॉकर उघडण्याचे नियम

तुम्हाला कोणत्याही बँकेत विना खातं लॉकर उघडता येणार आहे. मात्र एखाद्या बँकेत खातं नसल्यास त्या बँकेकडून लॉकर उघडण्यासाठी त्याकरता लागणारं शुल्क आणि सिक्युरिटी डिपॉझिटची कारणं देण्यात येतात. काहीवेळी बँकेकडून एफडी (FD) काढण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो. अशावेळी ज्या बँकेत बचत खातं आहे, तिथेच लॉकर उघडणं केव्हाही चांगलं.


लॉकरचा वापर कसा कराल?

प्रत्येक लॉकरसाठी चावी पुरवण्यात येते. एक चावी ग्राहकाकडे तर दुसरी बँकेकडे असते. दोन्ही चाव्यांचा वापर करूनच लॉकर उघडण्यात येईल. जेव्हा ग्राहकाला लॉकरचा वापर करायचा असेल, तेव्हा त्याची माहिती बँकेला असणं आवश्यक आहे. दुसऱ्या कुणाच्या हातात तुमची चावी गेल्यास तो लॉकर उघडू शकत नाही.


नुकसान भरपाई?

लॉकरमध्ये ठेवलेल्या कोणत्याही गोष्टींसाठी बँक जबाबदार नाही. भूकंप, पूरासारखी नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ला किंवा चोरी झाल्यास बँक कोणतीच नुकसान भरपाई देत नाही. लॉकरमध्ये असणाऱ्या वस्तूंबाबत बँकेला माहिती नसते. त्यामुळे लॉकरमध्ये असणारी तुमची कोणतीही किंमती वस्तू १०० टक्के सुरक्षित आहेच असं नाही.हेही वाचा

Car Loan घ्यायचंय? मग जाणून घ्या बँकांचे व्याजदर

ATM च्या वापरावर मोजावे लागू शकतात जादा शुल्क

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा