Advertisement

आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चर्चा

कोरोना व्हायरसमुळं आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी चर्चा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात करण्यात आली आहे.

आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चर्चा
SHARES

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची (Corona) संख्या १० वर पोहोचली आहे. त्यातचं आता पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोरोनाचे २ रुग्ण आढळले आहेत. जगभरात या कोरोना वायरसमुळं (Corona Virus) नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. अशातच गर्दीच्या ठिकाणी या कोरोना व्हायरसचा शिरकाव लगेच होतो. त्यामुळं काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलवर (IPL) कोरोनाचं सावट असणार आहे. आयपीएलमधील सामने पाहाण्यासाठी क्रिकेटप्रेमी स्टेडीयममध्ये मोठी गर्दी करतात. त्यावेळी सतर्क न राहिल्यास कोरोनाची भिती वर्तवली जाते आहे. त्यामुळं आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी चर्चा  महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात करण्यात आली आहे.

करोना व्हायरसमुळं (Corona Virus) आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, याबाबत महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चर्चा करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीत आयपीएलच्या तिकीट (IPL Ticket) विक्रीवर बंदी घालण्यात यावी, असा निर्णय राज्य सरकानं (State Government) घेतल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, आता आयपीएल पुढे ढकलण्यावरही महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात (Maharashtra Cabinate Meeting) चर्चा होत आहे. त्यामुळं 'आयपीएल पुढे ढकलली गेली तर बीसीसीआयला (BCCI) मोठा आर्थिक फटका बसू शकतो’, असं म्हटलं जात आहे.

आयपीएलचे सामने बघण्यासाठी एकावेळी जवळपास ५० हजार लोकं एकत्र जमतात. करोनाच्या वातावरणात अशा क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्याची सरकारची इच्छा नाही. या विषयावर कॅबिनेटमध्ये प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. त्यात २ पर्यायांवर चर्चा करण्यात आली. आयपीएलचे सामने व्हावेत, पण तिकिट विक्री करण्यात येऊ नये. तिकिट विक्रीशिवाय सामने भरवण्यात यावेत. लोकांनी घरीच बसून थेट प्रक्षेपण पाहावं हा एक पर्याय समोर आहे.

आयपीएलचे सामने पुढे ढकलण्याचा दुसराही पर्याय आहे. त्यावरही विचार झाला. कारण रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणं खेळाडूंनाही प्रोत्साहन देणारं ठरणार नाही. त्यामुळं या दोन्ही पर्यायांवर चर्चा झाली असून, त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळं आता आयपीएल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा