महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मोहीम, 'या' १० उपाययोजनांवर भर

मुंबईतील साकीनाका बलात्कार (mumbai sakinaka rape case) आणि हत्या प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कडक पावलं उचलली जाणार आहेत. मुंबई पोलिसांनी यासाठी अनेक उपक्रम हाती घेतली.

  • मुंबईमध्ये आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वुमन सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे. तसंच, निर्भया पथक उपक्रम सुरू केले जाणार आहेत.
  • पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणे, निर्जन ठिकाणांचा आढावा घेवुन त्या ठिकाणी बीट मार्शल, पेट्रोलिंग मोबाईल वाहनं यांची जास्तीत जास्त गस्त ठेवावी.
  • अंधाराच्या आणि निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्याकरीता महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा तसंच अशा ठिकाणी सी.सी.टी.व्ही बसविण्याकरीता संबंधीताकडे प्रस्ताव सादर करून याबाबत पाठपुरावा करावा.
  • निर्जन स्थळी, अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड लावावेत, जेणेकरुन अनुचित प्रकार टाळता येईल आणि त्यास प्रतिबंध करता येईल
  • पोलीस ठाणे हददीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला प्रसाधनगृहे आहेत. त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी.
  • गस्ती दरम्यान पोलिसांनी संशयीत व्यक्ती आढलळी तर त्याची चौकशी करावी तसंच गरज भासल्यास कारवाई करावी.
  • रात्री गस्ती दरम्यान एखादी महिला एकटी आढळून आल्यास महिला पोलीस अधिकारी/ अंमलदारांमार्फत विचारपूस करून त्यांना तात्काळ योज्य ती मदत देण्यात यावी.
  • पोलीस ठाणे हददीतील अंमली पदार्थांची नशा करणारे आणि अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांवर योग्यती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
  • पोलीस ठाणे हददीत रस्त्यावर बेवारसरित्या बऱ्याच काळापासून उभ्या असलेल्या टेम्पो, टॅक्सी, टूक आणि गाड्यांच्या मालकांचा शोध घेवून वाहनं त्यांना तेथून काढण्यास सांगावीत.
  • ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानके आहेत आणि बाहेरून येणाऱ्या लांब पल्याच्या गाडया थांबतात अशा सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्ताकरीता एक मोबाईल वाहन रात्री १० वा ते सकाळी ७ वाजेपर्यंत तैनात करण्यात यावी.


हेही वाचा

राज्यात महिलांवर होणाऱ्या ८० टक्के अत्याचारामागे परप्रांतीय, मनसेचा दावा

साकिनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या