राज्यात महिलांवर होणाऱ्या ८० टक्के अत्याचारामागे परप्रांतीय, मनसेचा दावा

राज्यात महिलांवर होणाऱ्या ८० टक्के अत्याचारामागे परप्रांतीय गुन्हेगार आहेत, असा दावा मनसेनं केला आहे.

राज्यात महिलांवर होणाऱ्या ८० टक्के अत्याचारामागे परप्रांतीय, मनसेचा दावा
SHARES

राज्यात महिलांवर होणाऱ्या ८० टक्के अत्याचारामागे परप्रांतीय गुन्हेगार आहेत, असा दावा मनसेनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचवेळी मनसेकडून हा दावा करण्यात आला आहे.

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साकीनाका घटनेबाबत गृहमंत्र्यांना निवेदन देऊन पीडितेला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधलं.

राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये ८० टक्के परप्रांतीय गुन्हेगार आहेत. राज ठाकरे यांनीच सर्वात आधी परप्रांतीयांच्या नोंदणीचा मुद्दा मांडला होता. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. राज ठाकरे यांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

राज्यातील महिला अत्याचारांच्या तक्रारीवर पोस्को कायदा आणि शक्ती कायदा हा नागपूर अधिवेशनात राज्यात अंमलात आला पाहिजे. साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे केली आहे, असं त्या म्हणाल्या.

माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना विशेष निर्देश दिले आहेत.

यामध्ये इथून पुढे परप्रांतियांची नोंद ठेवण्याचे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पोलिसांना अतिशय महत्त्वाच्या सूचना दिल्या.



हेही वाचा

परप्रांतीयांची नोंद ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

धक्कादायक! मुंबईत यावर्षी जुलैपर्यंत ५५० बलात्काराचे गुन्हे दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा