परप्रांतीयांची नोंद ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश


परप्रांतीयांची नोंद ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
SHARES

साकीनाका प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे परप्रांतीयांची नोंद ठेवा, असे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 'राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो? कुठे जातो?' याची नोंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. राज्यातील महिला अत्याचारांवर बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत हे आदेश दिलेत.

मुंबईतल्या साकीनाका निर्भया प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो, कुठे जातो, याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. पोलीस महासंचालक कार्यालयात काल गृहविभागाची आढावा बैठकीत झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत.

राज्याला हादरवून टाकणाऱ्या मुंबईतील साकिनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींने गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी महिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. या आरोपीवर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा