धक्कादायक! मुंबईत यावर्षी जुलैपर्यंत ५५० बलात्काराचे गुन्हे दाखल

पोलिसांनी यावर्षी जुलैपर्यंत शहरात ५५० बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत.

धक्कादायक! मुंबईत यावर्षी जुलैपर्यंत ५५० बलात्काराचे गुन्हे दाखल
SHARES

मुंबई पोलिसांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, पोलिसांनी यावर्षी जुलैपर्यंत शहरात ५५० बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ४४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे, असं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

अलिकडेच, मुंबईच्या साकीनाका इथल्या ३२ वर्षीय महिलेची बलात्कारा करून हत्या केली. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. रविवारी, राष्ट्रीय महिला आयोग (NCW)नं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासह (NCSC) पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली.

उपलब्ध माहितीनुसार, ५५० प्रकरणांपैकी ३२३ घटनांमध्ये लैंगिक अत्याचार करणारे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. हे देखील सोमर आले आहे की, ३०३ आरोपी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात हवा खात आहेत. त्यापैकी १४२ लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना पकडण्यात आलं.

पोलीस अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की, २०२० मध्ये बलात्काराचे ७६६ गुन्हे नोंदवण्यात आले, ज्यात ६५८ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. यापैकी, अल्पवयीन ४४५ आणि ३२१ मुलं ही १८ वर्षांवरील आहेत. अल्पवयीन आणि मोठ्या पीडितांना अनुक्रमे ४१९ आणि २३९ ला लैंगिक अत्याचार केल्याबद्दल पकडण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

२०१९ मध्ये, कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत १ हजार ०१५ प्रकरणं नोंदवली गेली. ज्यातून ९३१ प्रकरणं सापडली. त्याचप्रमाणे, २०२१. २०२० आणि २०१९ मध्ये, अनुक्रमे १ हजार १००, १ हजार ९४३ आणि २ हजार ६७८ प्रकरणं महिलेच्या विनम्रतेचा अपमान केल्याबद्दल नोंदवण्यात आली. यापैकी अनुक्रमे ८६०, १ हजार ५३९  आणि २ हजाक २७७ आरोपींना अटक करण्यात आली.हेही वाचा

साकीनाका बलात्कारप्रकरणी 'अ‍ॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल

तरुणीच्या घरी सेक्स टॉईज पाठवले, मुंबईतील तरुण अटकेत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा