मांडूळ साप विकणाऱ्या दोघांना अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • क्राइम

धारावीतील माहीम निसर्ग उद्यानाजवळ मांडूळ प्रजातीच्या संरक्षित वन्य जीवाची तस्करी करणाऱ्या २ व्यक्तींना गुरुवारी मुंबई पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. याबाबत मुंबईचे पोलिस उप निरीक्षक महेंद्र पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली असून त्यांनी सापळा रचून या दोघांना पकडलं तसंच त्याच्याजवळ असलेल्या सॅक बॅगमधून ३० लाख रुपये मिळाल्याची माहिती पुढे येत आहे.

उ. प्रदेशातून आले होते

विनोद कुमार आशाराम मौर्या (२८) आणि राजेश छोटे मौर्या (३५) असं या आरोपींचं नाव असून हे दोघे उत्तर प्रदेशातील भिनगा येथे राहणारे आहेत. हे दोघे गुरुवारी दु. ४.४० वा. सुमारास मांडूळ प्रजातीच्या संरक्षित वन्य जीवाची विक्री करण्यासाठी मुंबईत आले होते. 

त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी माहिम निसर्ग उद्यानाजवळ सापळा रचला होता. यावेळी या भागात दोन व्यक्तींची वृत्ती संशयास्पद आढळल्यामुळे पोलिसांनी त्यांची तपासणी केली. या तपासणीत त्यांच्याकडे ३० लाख किंमतीचा साप सापडल्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी कलम ९, कलम ३९(३), कलम ४४, कलम ४८ अ, कलम ५१ वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा -

किर्ती व्यासच्या मृतदेहाचा शोध अद्यापही सुरूच

गोवंडीत हॉटेलमध्ये गोळीबार, ५ जणांना अटक


 

पुढील बातमी
इतर बातम्या