SHARE

गोवंडी परिसरातील ऑरेंज मिंट कॅफे हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री २.१५ वा. सुमारास दोन जणांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. विकत घेतलेल्या सेकंड हॅन्ड कारचे पैसे वेळेवर देत नसल्यामुळे गोळीबार केल्याचे समजते. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.


गाडीचे पैसे न दिल्याने हल्ला

सायन-कोळीवाडा येथे राहणाऱ्या राकेश सोनावणे आणि श्वेता पांडे यांनी नेरुळ येथील अम्रापाली सेक्टर-२ येथे राहणाऱ्या जतीन आहुजा (३३) याच्याकडून सेकंड हॅन्ड गाडी विकत घेतली होती. मात्र, गाडीचे पैसे वेळेवर देत नसल्यामुळे त्याने राकेश सोनावणे आणि श्वेता पांडे यांच्यावर ऑरेंज मिंट कॅफेमध्ये वाढदिवस साजरा करत असताना गोळीबार केला.

या प्रकरणी आरोपीकडून ७.६५ मिमी पिस्तूल जप्त केले अाहे. तसेच आरोपींना शनिवारी कोर्टात हजर करण्यात येणार अाहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या