किर्ती व्यासच्या मृतदेहाचा शोध अद्यापही सुरूच

पोलिसांनी किर्तीचा मृतदेह शोधण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. पोलिसांनी ड्रोन आणि स्थानिक कामगारांच्या मदतीने सुरू केलेल्या शोधकार्याला यश न मिळाल्याने आता पोकलेनच्या मदतीने पोलिस खाडीत उतरून मृतदेहाचा शोध घेत आहेत.

किर्ती व्यासच्या मृतदेहाचा शोध अद्यापही सुरूच
SHARES

बहुचर्चीत किर्ती व्यास प्रकरणात पोलिसांनी किर्तीचा मृतदेह शोधण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. पोलिसांनी ड्रोन आणि स्थानिक कामगारांच्या मदतीने सुरू केलेल्या शोधकार्याला यश न मिळाल्याने आता पोकलेनच्या मदतीने पोलिस माहुलच्या खाडीत उतरून मृतदेहाचा शोध घेत आहेत.


एक महिना उलटला

किर्ती व्यास हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ८ मे पासून मृतदेह शोधण्यास सुरूवात केली. एक महिना उलटला तरी पोलिसांनी अजूनही हार मानलेली नाही. विविध पद्धतीने पोलिस मृतदेहाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी "क्यूडी" या कंपनीच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी विशेष ड्रोनचा वापर केला. त्यात अपयश आल्यानंतर पोलिसांनी "आयसेन्सर ड्रोन"चाही उपयोग केला.


स्थानिक कामगारांची मदत

त्यामुळे पोलिस आता स्थानिक कामगारांच्या मदतीने सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ अशा दोन सत्रात तिवरांच्या झाडांमध्ये मृतदेहाचा शोध घेत आहेत.हाडेही जनावरांची

या शोध प्रक्रियेत पोलिसांना आतापर्यंत तीन ते चार हाडे मिळाली होती. मात्र जे.जे. रुग्णालयातील वैद्यकिय तपासणीत ती हाडे जनावरांची असल्याचं पुढं आलं. याशिवाय किर्तीने घातलेल्या गुलाबी रंगाचं बूट शोधताना पोलिसांनी खाडी परिसरातील ६०० हून अधिक बूट तपासले आहेत. एवढंच नव्हे, तर ३०० निळ्या रंगाच्या जिन्स आणि किर्तीकडे असलेल्या बॅगेप्रमाणे ६० ते ७० बॅगा नाल्यातून काढून तपासल्या. तरीही पोलिसांना किर्तीचा बूट आणि बॅग सापडलेली नाही.


पुतळा खाडीत फेकणार

त्यामुळे पोलिसांनी आता पोकलेनच्या मदतीने गाळ उपसून मृतदेहाचा शोध घेण्याचं ठरवलं आहे. तर किर्तीची उंची आणि वजन असलेला पूतळा बनवून त्यात सेन्सर लावून तो पुतळा खाडी परिसरात फेकून पोलिस चाचपणी करणार असल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.हेही वाचा-

आणि खुशीने कोर्ट डोक्यावर घेतलं

किर्ती व्यासच्या मारेकऱ्यांना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा