आणि खुशीने कोर्ट डोक्यावर घेतलं

खुशी आणि सिद्धेशला मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. त्यावेळी पोलिसांनी किर्तीचा मृतदेह अद्याप न सापडल्याने आरोपींची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र कित्येक दिवस उलटूनही पोलिसांकडे दोघांविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी सिद्धेश आणि खुशीच्या वकिलांनी न्यायालयात केली.

आणि खुशीने कोर्ट डोक्यावर घेतलं
SHARES

किर्ती व्यास हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सेजवानी या दोघांच्या पोलिस कोठडीत न्यायाधीशांनी वाढ केली. न्यायधीशांच्या घोषणेनंतर राग अनावर झालेल्या खुशीने फोर्टच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरडा ओरडा करून आपण निर्दोष असल्याचं सांगत कोर्ट डोक्यावर घेतलं.

अभिनेता फरहान खानची पूर्वीची पत्नी अनुधा हिच्या अंधेरी पश्चिमेकडील 'बि ब्लंट' या कार्यालयातील फायनांन्स मॅनेजर म्हणून किर्ती कामाला होती. या कार्यालयात सिद्धेश अकाऊंट एक्झ्युक्युटीव्ह आणि खुशी अकादमी मॅनेजर म्हणून कामाला होते. या दोघांनी मिळून किर्तीची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.



मृतदेह सापडेना

खुशी आणि सिद्धेशसोबत त्याच्या गाडीत किर्ती शेवटची आढळून आली होती. त्यानंतर तिचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही. पोलिस तपासात खुशीच्या गाडीत किर्तीचं रक्त आढळून आल्याने आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी सिद्धेश आणि खुशीला अटक केली.


निर्दोष असल्याचा दावा

दोघांच्या चौकशीतून किर्तीची हत्या करून या दोघांनी तिला माहूल खाडीत टाकल्याचं पुढं आलं. मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही किर्तीचा मृतदेह सापडला नाही. तर दुसरीकडे आपण किर्तीची हत्या केलीच नसल्याचा दावा हे दोघे करत आहेत. अटकेनंतर कोर्टाने दोघांना १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.


न्यायालयीन कोठडीची मागणी

त्यानुसार खुशी आणि सिद्धेशला मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. त्यावेळी पोलिसांनी किर्तीचा मृतदेह अद्याप न सापडल्याने आरोपींची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र कित्येक दिवस उलटूनही पोलिसांकडे दोघांविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी सिद्धेश आणि खुशीच्या वकिलांनी न्यायालयात केली.


म्हणून राग अनावर

त्यावर न्यायाधीशांनी २ दिवसांची म्हणजेच १७ मे पर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिल्याने राग अनावर होऊन खुशीने न्यायालयातच आरडा ओरडा करण्यास सुरूवात केली. आम्ही निर्दोष आहोत, आम्ही कुणाचीही हत्या केलेली नाही. पोलिस विनाकारण आम्हाला अडकवू पहात आहेत. दररोज ते आम्हाला टाॅर्चर करत असून आम्ही त्रस्त झालो आहोत. आम्हाला सोडा असा आरडो ओरडा करत खुशीने कोर्ट डोक्यावर घेतलं. त्यावेळी पोलिसांनी खुशीला कोर्टातून बाहेर नेत प्रकरण हाताळलं.



हेही वाचा-

किर्ती व्यासचा मृतदेह कोल्ह्यांनी खाल्ला?  

किर्ती व्यासचा मृतदेह शोधण्यासाठी अाता 'आयपीएल'मधील ड्रोनचा वापर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा