'प्री प्लॅन' करून किर्ती व्यासची हत्या

कामचुकार सहकाऱ्यांना किर्तीने दटावल्याच्या रागातून आरोपींनी हे कृत्य केलं असलं, तरी आरोपींनी किर्तीला पहिल्यांदा समजवण्याचा विचार केला होता आणि किर्तीने ऐकलंच नाही तर तिची हत्या करायची हे ठरवल्याचं दोघांनी पोलिसांना सांगितलं. किर्तीच्या खुनाचा उलगडा होत असला, तरी पोलिसांना अद्याप तिचा मृतदेह सापडलेला नाही.

'प्री प्लॅन' करून किर्ती व्यासची हत्या
SHARES

फायनांन्स मॅनेजर किर्ती व्यासची हत्या पूर्वनियोजीत पद्धतीने (प्री प्लान) करून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. कामचुकार सहकाऱ्यांना किर्तीने दटावल्याच्या रागातून आरोपींनी हे कृत्य केलं असलं, तरी आरोपींनी किर्तीला पहिल्यांदा समजवण्याचा विचार केला होता आणि किर्तीने ऐकलंच नाही तर तिची हत्या करायची हे ठरवल्याचं दोघांनी पोलिसांना सांगितलं. किर्तीच्या खुनाचा उलगडा होत असला, तरी पोलिसांना अद्याप तिचा मृतदेह सापडलेला नाही.


काय आहे प्रकरण?

अभिनेता फरहान खानची पूर्वीची पत्नी अनुधा हिच्या अंधेरी पश्चिमेकडील 'बि ब्लंट' या कार्यालयात फायनांन्स मॅनेजर म्हणून किर्ती कामाला होती. या कार्यालयात सिद्धेश अकाऊंट एक्झिक्युटीव्ह आणि खुशी अॅकॅडमी मॅनेजर म्हणून कामाला होती. ही दोघंही कामचुकारपणा करत असल्याने किर्तीने दोघांना १६ मार्चपर्यंत कामात सुधारणा करण्याची नोटीस पाठवली होती. मात्र आपली गच्छंती पक्की आहे. हे समजल्यानंतर सिद्धेशने किर्तीला एकट्यात भेटून समजवायचं ठरवलं होतं. या पूर्वी ही आॅफिसमधल्या कामातून दोघांमध्ये तू-तू मै-मै झाली होती. त्याचाही राग सिद्धेशच्या डोक्यात होता. या प्रकरणात सिद्धेशची सहकारी खुशी सिद्धेशला मदत करत होती.आॅफिसला सोडण्याचा बहाणा

दरम्यान १६ मार्च रोजीच सिद्धेश आणि खुशीने किर्तीला कार्यालयात सोडण्याच्या बहाण्याने बोलवून तिची समजूत काढायचं ठरवलं. त्यानुसार सिद्धेश गाडी घेऊन किर्तीच्या घराखाली आला. त्यावेळी खुशी कार चालवत होती. तर सिद्धेश मागे बसला होता. किर्ती आल्यानंतर ती पुढच्या सीटवर येऊन बसली. त्यानंतर दोघांनी किर्तीला समजवण्याचा प्रयत्न केला.


मागून गळा आवळला

मात्र किर्तीचा 'ना' चा पाडा सुरू असल्याने सिद्धेशने चालत्या गाडीत ओढणीच्या मदतीने मागून किर्तीचा गळा आवळला. तिच्या नाकातून रक्त आलं. त्यावेळी किर्तीने बचावासाठी धडपड केली. किर्तीची हत्या केल्यानंतर सिद्धेशने चालत्या गाडीतच किर्तीला मागे खेचून डिक्कीत टाकलं. त्यानंतर हे दोघेही तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा शोधत होते. अवघ्या ७ मिनिटांत त्यांनी किर्तीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी तपासले ५०० सीसीटिव्ही

किर्ती व्यासच्या हत्येचा उलघडा करताना पोलिसांनी आतापर्यंत ५०० हून अधिक सीसीटिव्ही तपासले आहेत. त्यानुसार १६ मार्चला ग्रँन्टरोड इथून आॅफिससाठी सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी किर्ती तिच्या बिल्डिंगखालून निघत असल्याचं सीसीटिव्हीत स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर किर्ती सिद्धेशच्या गाडीत बसली. त्यावेळी किर्ती खुशीच्या शेजारी म्हणजेच चालकाच्या बाजूला बसताना दिसत आहे. मात्र पुढे ९ वाजून २५ मिनिटांनी त्यांची गाडी आग्रीपाडा इथं पोहचली. त्या ठिकाणच्या सीसीटिव्हीत किर्ती पुढच्या सिटवर दिसून येत नाही. त्यामुळे या ७ मिनिटांतच या दोघांनी तिची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


मृतदेहाच्या विल्हेवाटीचा प्लान फसला

किर्तीची हत्या केल्यानंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून दोघेही खुशीच्या सांताक्रूझ येथील घरी गेले. त्या ठिकाणी पार्किंगमध्ये गाडी पार्क करून हे दोघे नियमीत कामाला गेले. कामावरून सुटल्यानंतर दोघेही किर्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घराबाहेर पडले. किर्तीचा मृतदेह शहरातील वर्दळ कमी असलेल्या ठिकाणच्या नाल्यात फेकल्यास तो मृतदेह वाहून जाईल, असा त्याचा समज होता.


नाल्यात टाकला मृतदेह

त्यानुसार वांद्रे-सायन येथील मिठी नदीत किर्तीचा मृतदेह टाकण्याचा त्यांचा प्लान होता. मात्र या परिसरात गाड्यांची सतत वर्दळ सुरू असल्याने त्यांनी प्लान बदलला. त्यानंतर हे दोघांनी वडाळा येथील फ्री वे वरून नाल्यात मृतदेह टाकण्याचं ठरवलं. मात्र त्या ठिकाणीही गाड्यांची सतत वर्दळ असल्याने या दोघांनी माहुलगावला जाणाऱ्या सुमसाम रस्त्यावर आपली गाडी वळवली. रात्री ८.५० ते ९. ४० वाजेपर्यंत ते त्या भागात गाडीने फिरत होते. त्या ठिकाणच्या नाल्यात त्यांनी किर्तीचा मृतदेह टाकल्याचं पोलिसांना सांगितलं.किर्ती बेपत्ता होऊन एक महिना उलटल्यानंतर देखील डी. बी मार्ग पोलिसांच्या हाती काहीच न लागल्यामुळे किर्तीच्या कुटुंबियांनी पोलिस आयुक्तालयात येऊन माझी भेट घेतली. त्यावेळी किर्तीची बहिण शेफाली व्यासने सिद्धेश आणि खुशी यांचा या गुन्ह्यात कसा संबध आहे, हे समजवून सांगत त्यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यावेळी मी गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांना बोलवून ही केस पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींचा छडा लावला.
- दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलिस आयुक्तहेही वाचा-

किर्ती व्यासच्या हत्येप्रकरणी २ सहकाऱ्यांना अटक

घाटकोपर बाॅम्बस्फोटातील आरोपीला १६ वर्षांनंतर अटकRead this story in हिंदी
संबंधित विषय