घाटकोपर बाॅम्बस्फोटातील आरोपीला १६ वर्षांनंतर अटक

घाटकोपर इथं २ डिसेंबर २००२ रोजी सायंकाळी बेस्ट बस डेपोतील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये जवळपास ४९ जण जखमी झाली होते. या गुह्यात या पूर्वी पोलिसांनी १९ जणांना अटक केली होती. तर आजही या गुन्ह्यातील ९ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या फरार आरोपींमध्ये इरफानचा सहभाग होता.

घाटकोपर बाॅम्बस्फोटातील आरोपीला १६ वर्षांनंतर अटक
SHARES

मुंबईत २००२ साली घाटकोपर इथं झालेल्या बाॅम्बस्फोटाचा मास्टरमाइंड इरफान कुरेशी याला गुजरात एटीएसने नुकतीच औरंगाबाद इथून अटक केली. ओमानच्या निमित्ताने नातेवाईकांना भेटण्यासाठी इरफान औरंगाबादला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुजरात एटीएसने पुढील तपासासाठी इरफानला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

घाटकोपर इथं २ डिसेंबर २००२ रोजी सायंकाळी बेस्ट बस डेपोतील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये जवळपास ४९ जण जखमी झाली होते. या गुह्यात या पूर्वी पोलिसांनी १९ जणांना अटक केली होती. तर आजही या गुन्ह्यातील ९ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या फरार आरोपींमध्ये इरफानचा सहभाग होता.

१६ वर्षांपासून चकवा

मागील १६ वर्षांपासून तपास यंत्रणांना चकवा देणाऱ्या इरफानची माहिती गुजरात एटीएसला मिळली. इरफान ओमान सणासाठी औरंगाबाद येथील कुटुंबियांच्या भेटीला शहा कॉलनी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली.हेही वाचा-

१९९३ बाॅम्बस्फोटातील 'टकला' मुंबई पोलिसांच्या ताब्यात

१९९३च्या मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यूRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा