किर्ती व्यासचा मृतदेह शोधण्यासाठी अाता 'आयपीएल'मधील ड्रोनचा वापर

क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटप्रेमींसह खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या '४ के' क्वालिटीच्या ड्रोनचा वापर अाता किर्ती व्यासच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी केला जात अाहे.

किर्ती व्यासचा मृतदेह शोधण्यासाठी अाता 'आयपीएल'मधील ड्रोनचा वापर
SHARES

क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटप्रेमींसह खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या '४ के' क्वालिटीच्या ड्रोनचा वापर अाता किर्ती व्यासच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी केला जात अाहे. माहूल येथील समुद्राच्या दीड किलोमीटर परिसरातील तिवरांच्या झाडांमध्ये किर्ती व्यासच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी ३० ते ३५ मीटर उंचावरून हे ड्रोन गुरुवारी पोलिसांनी उडवलं होतं.


मृतदेह मिळण्यात अडचणी

बहुचर्चित किर्ती व्यास हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं असलं तरी किर्ती व्यासचा मृतदेह मिळणं या गुन्ह्यात खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा, हा गुन्हा तपासाच्या दृष्टीनं कमकुवत होऊन आरोपी सुटण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून पोलीस किर्तीच्या मृतदेहाचा शोध माहूल खाडीत घेत आहेत. मात्र ओहोटी आणि भरतीमुळे पोलिसांना मृतदेह शोधण्यासाठी फक्त सहा तासांचा कालावधी मिळत अाहे.



अखेर घेतला ड्रोनचा अाधार

त्यामुळेच ड्रोनच्या मदतीनं पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेण्याचं ठरवलं. सुरूवातीला साध्या ड्रोननं पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हाती ठोस पुरावे न लागल्यामुळे पोलिसांनी उत्तम दर्जाच्या ड्रोनच्या मदतीनं मृतदेहाचा शोध घेण्याचं ठरवलं.


ही अाहे ड्रोनची खासियत

आयपीएलसाठी वापरण्यात आलेलं ड्रोन हे 'क्यू डिच' या कंपनीचं आहे. या कंपनीतील उत्तम दर्जाच्या ४ के या ड्रोनच्या सहाय्यानं गुरुवारी पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. या ड्रोन कॅमेऱ्यांची खासियत म्हणजे या ड्रोनमधील कॅमेरे १६ मेगापिक्सलचे आहेत. त्यात १२८ जीबी मेमरी कार्ड असून हे ड्रोन एक ते दीड किलोमीटर लांब जाऊ शकते. तसंच पाचशे मीटर उंचावर उडवता येते. या ड्रोनची बॅटरी फक्त २२ मिनिटं काम करते. या ड्रोनच्या मदतीनं पोलिसांनी तिवरांच्या झाडांमधील फूटेज घेतलं असून ते फूटेज पोलीस स्लो मोशनमध्ये तपासणार आहेत.


ड्रोनचा दिवसाचा खर्च ४० हजार

'क्यू डिच' या कंपनीनं आतापर्यंत विविध राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी ड्रोन पुरवले होते. गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी या ड्रोनची मदत घेतली होती. त्याचबरोबर तेलंगणा आणि छत्तीसगढमध्ये जंगलात लपलेल्या नक्षलवादी आणि माअोवाद्यांचा शोध घेण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. या ड्रोनचं एका दिवसाचं भाडं ३५ ते ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा -

किर्ती व्यासचा मृतदेह कोल्ह्यांनी खाल्ला? शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर

'तुमच्या बंदुकीने मला शूट करा, मी हत्या केलेली नाही'

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा