'तुमच्या बंदुकीने मला शूट करा, मी हत्या केलेली नाही'


'तुमच्या बंदुकीने मला शूट करा, मी हत्या केलेली नाही'
SHARES

किर्ती व्यास हत्या प्रकऱणातील मुख्य आरोपी सिद्धेश ताम्हणकरने चौकशीदरम्यान पोलिसांच्या त्याच-त्याच प्रश्नांना कंटाळून अाता 'तुमच्या बंदुकीने मला शूट करा, मी हत्या केलेली नाही', असे म्हटल्याचे समोर अाले अाहे. पोलीस चौकशीनंतर काय घडले, याची सविस्तर कहाणी तो मित्रांना सांगायचा. या प्रकरणामुळे सिद्धेश खूपच तणावाखाली असून त्याने पोलिसांना अापल्यावर गोळी झाडण्याची विनंती केली अाहे. सिद्धेशने हे कृत्य केल्याच्या घटनेवर अामचा विश्वास नसून तो मनमिळाऊ, सर्वांच्या मदतीला धावणारा मुलगा असल्याचं त्याच्या मित्रांनी म्हटलं अाहे.


पोलिसांना सहकार्य केलं

किर्ती बेपत्ता झाल्यापासून सिद्धेश तिला शोधण्याचा प्रयत्न करत होता. किर्ती बेपत्ता झाल्यापासून तो पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत होता. दिवसभर चौकशीच्या फेऱ्यातून घरी आल्यानंतर सिद्धेश खूपच तणावाखाली असायचा. मी काहीच केलं नाही, तरी मला दिवसभर किर्ती कुठे गेली? तू तिच्यासोबत काय केलंस? या प्रश्नांचा भडीमार पोलिस सतत करायचे. दिवसभर त्याच प्रश्नांच्या भडीमाराने डोके सुन्न व्हायचे, असे सिद्धेश अापल्या जवळच्या मित्रांना सांगायचा.


पोलीस चौकशीला वैतागला

रोजच्या त्रासाला कंटाळून एकेदिवशी सिद्धशने वैतागून पोलिसांना म्हणाला की, “मी कोऱ्या कागदावर सही करून देतो. तुम्हाला काय लिहायचं, ते लिहा. मला गोळ्या झाडा.” किर्ती आणि सिद्धेश एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. नोकरीसाठी सिद्धेश असं काही करणार नाही, याची पूर्ण खात्री त्याच्या मित्रांना आहे.


पोलिसांचे अारोप खोटे

या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या डी.बी मार्ग पोलिसांनी खुशी आणि सिद्धेशला चौकशीसाठी बोलावलं. त्यावेळी सिद्धेशनं पुढच्या सीटवर बसलेल्या किर्तीला कसं मागे अोढलं असेल, या घटनेचं पोलीस रुपांतर करून पाहत होते. त्यावेळी सिद्धेश आणि खुशीला त्या गाडीतील सीट कशी पुढे घेतात, हेसुद्धा माहित नव्हतं. ते त्यांना पोलिसांनी दाखवलं. असं असताना सिद्धेशनं किर्तीला मारून तिला चालत्या गाडीत डिक्कीत टाकल्याचा खोटा आरोप पोलीस करत आहेत. सिद्धेशला आम्ही लहानपणापासून ओळखतो. तो तसा मुलगा नाही, असंही सिद्धेशच्या मित्रांनी सांगितलं.


हेही वाचा -

'प्री प्लॅन' करून किर्ती व्यासची हत्या

किर्ती व्यासचा मृतदेह कोल्ह्यांनी खाल्ला? शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा