किर्ती व्यासच्या मारेकऱ्यांना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

न्याय वैद्यक प्रयोग शाळेने दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी किर्तीचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सेजवाणीला यापूर्वीच अटक केली होती. या दोघांची पोलिस कोठडी गुरूवारी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या शिक्षेत वाढ करत त्यांची रवानगी न्यायालयी कोठडीत केली आहे.

किर्ती व्यासच्या मारेकऱ्यांना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी
SHARES

बहुचर्चित किर्ती व्यासच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सेजवाणी या दोघांना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आलं असलं, तरी किर्तीचा मृतदेह अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

न्याय वैद्यक प्रयोग शाळेने दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी किर्तीचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सेजवाणीला यापूर्वीच अटक केली होती. या दोघांची पोलिस कोठडी गुरूवारी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या शिक्षेत वाढ करत त्यांची रवानगी न्यायालयी कोठडीत केली आहे.


कोण आहे खुशी?

अभिनेता फरहान खानची पूर्वीची पत्नी अनुधा हिच्या अंधेरी पश्चिमेकडील 'बि ब्लंट' या कार्यालयातील फायनांन्स मॅनेजर म्हणून किर्ती कामाला होती. या कार्यालयात सिद्धेश अकाऊंट एक्झ्युक्युटीव्ह आणि खुशी अकादमी मॅनेजर म्हणून कामाला होते. या दोघांनी मिळून किर्तीची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


पुराव्यांच्या आधारावर दोघांना अटक

खुशी आणि सिद्धेशसोबत त्याच्या गाडीत किर्ती शेवटची आढळून आली होती. त्यानंतर तिचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही. पोलिस तपासात खुशीच्या गाडीत किर्तीचं रक्त आढळून आल्याने आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी सिद्धेश आणि खुशीला अटक केली.


किर्तीची हत्या न केल्याचा दावा

दोघांच्या चौकशीतून किर्तीची हत्या करून या दोघांनी तिला माहूल खाडीत टाकल्याचं पुढं आलं. मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही किर्तीचा मृतदेह सापडला नाही. तर दुसरीकडे आपण किर्तीची हत्या केलीच नसल्याचा दावा हे दोघे करत आहेत. अटकेनंतर कोर्टाने दोघांना 15 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. गुरूवारी दोघांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने दोघांना 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


त्यांचे कपडे पोलिसांच्या ताब्यात

किर्तीची हत्या झाली त्या दिवशी सिद्धेश आणि खुशीने घातलेले कपडे आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ते कपडे पुढील तपासासाठी कलिनाच्या न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे.


दोघांच्या कुटुंबियांचा आरोप

पोलिसबळाचा वापर करून दोघांकडून हत्येची कबुली वदवून घेत असल्याचा आरोप दोघांच्या कुटुंबियांनी केला आहे. तर या गुन्ह्यात कोणताही सबळ पुरावा नसताना पोलिसांनी दोघांना अटक केल्याचं सिद्धेश आणि खुशीच्या वकिलांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हटलं आहे.


हेही वाचा - 

आणि खुशीने कोर्ट डोक्यावर घेतलं

किर्ती व्यासचा मृतदेह शोधण्यासाठी अाता 'आयपीएल'मधील ड्रोनचा वापर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा