ड्रोन टिपणार मुंबईकरांच्या हालचाली


ड्रोन टिपणार मुंबईकरांच्या हालचाली
SHARES

सण, उत्सव, आंदोलनं किंवा मोर्चे अशावेळी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या मुंबईच्या सुरक्षेसाठी पोलिसांना नेहमीच कंबर कसावी लागते. पण आता मुंबईच्या सुरक्षेसाठी गृहविभागाकडून सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता “4 जी क्वालिटी”च्या ड्रोनची भर पडणार आहे. त्यामुळे पोलिसांचं काम सोपं होणार आहे. पोलिस आता ड्रोनच्या सहाय्याने मुंबईवर लक्ष ठेवणार आहे. यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना ड्रोन उडवण्याचं ट्रेनिंगही दिलं जाणार आहे.


यासाठी पोलिसांनी घेतली ड्रोनची मदत

बहुचर्चित किर्ती व्यासच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेने नुकतंच पोलिसांनी आयपीएलसाठी वापरण्या येणाऱ्या ड्रोनची मदत घेतली. या ड्रोनची क्लालिटी आणि ड्रोनचा वापर शहराच्या सुरक्षेसाठी करता येऊ शकतो. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र सरकारने पोलिसांना नवीन ड्रोन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देण्यात येणार आहे. शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अनेकदा काही गोष्टी दिसून येत नाही, अशावेळी ड्रोन खूप उपयोगी पडू शकते. हे ड्रोन शहरातील सण, उत्सव, आंदोलनं, राजकीय मोर्चा, सभा आणि तणावदर्शक वातावरणात नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

या कंपनीसोबत सरकारची बोलणी सुरू

याबाबत आयपीएलमध्ये ड्रोन उडवण्याचे कंत्राट घेतलेल्या "क्यू डिच" या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारची बोलणी सुरू आहे. ही कंपनी पोलिसांच्या मागणीनुसार उत्तम दर्जाचे ४ के क्वालिटिच्या ड्रोन बनवून ते कसं उडवायचं याचं प्रशिक्षण पोलिसांना देणार आहे. या ड्रोन कॅमेऱ्यांची खासियत म्हणजे या ड्रोनमधील कॅमेरे १६ मेघा पिक्सलचे आहेत. त्यात १२८ जीबी मेमरी कार्ड असून हे ड्रोन एक ते दीड किलोमीटर लांब जाऊ शकते. हे ड्रोन पाचशे मीटर उंचावर उडवता येते. या ड्रोनची बॅटरी फक्त २२ मिनिटे काम करते. या ड्रोनच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी नागरिकांवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.


या कंपनीची खासियत?

"क्यू डिच" या कंपनीने आतापर्यंत विविध राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी ड्रोनची व्यवस्था केली होती. मागील महिन्यात राजस्थान येथे झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी या ड्रोनची मदत घेतली होती. त्याचबरोबर तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये जंगलात लपलेल्या नक्षलवादी आणि मावोवादींचा शोध घेण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या ड्रोनचं एका दिवसाचं भाडं ३५ ते ४० हजार रुपये असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

सध्या या प्रोजेक्टबाबत आम्ही सकारात्मक चर्चा गृह विभागाशी सुरू आहे. या प्रोजेक्टतून मुंबई शहराच्या सुरक्षेबरोबरच पोलिसांनाही मदत होणार आहे. हे ड्रोन कसं उडवावं याचं प्रशिक्षण देखील कंपनीच्या हँडलरतर्फे पोलिसांना देण्यात येईल. लवकरच हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात पोलिसांच्या मदतीला येईल. 
विघ्नेश संतनम - मार्केटिंग हेड, क्यूडी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा