माथेरानच्या ८०० फूट खोल दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

मुंबईजवळील पिकनीक स्पाॅट असलेल्या माथेरानमधील दरीत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गीता मिश्रा असं या महिलेचं नाव असून त्या दिवा इथं राहणाऱ्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू टीमने खोल दरीत उतरून ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गीता यांचा मृतदेह बाहेर काढला.

कशी घडली घटना?

गीता मिश्रा आपले पती, मित्र आणि दोन मुलींसह शनिवारी सकाळी माथेरानला फिरण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्या बेलविडीयर पाँईट इथं पोहोचल्या. दरीजवळ फिरत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली आणि त्यातच त्यांचा तोल जाऊन त्या ८०० फूट खोल दरीत कोसळल्या.

गीता दरीत कोसळल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. रेस्क्यू टीमने गीता यांचा शोध घेऊन ३ तासांनी त्यांचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला.


हेही वाचा-

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना जुहूच्या हॉटेलमधून अटक

रेल्वेमध्ये खिसे कापूंचा सुळसुळाट, ३ महिन्यात ५ हजार ९०८ तक्रारी


पुढील बातमी
इतर बातम्या