आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना जुहूच्या हॉटेलमधून अटक

जुहूच्या पंचताराकींत हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्यांचा गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन व्यापाऱ्यांना अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल ७ लाखांचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना जुहूच्या हॉटेलमधून अटक
SHARES

जुहूच्या पंचताराकींत हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्यांचा गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रुषी कन्हैय्यालाल दरीयानानी, महेश हिरो खेमलानी अशी या दोघांची नावं आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोन व्यापाऱ्यांना अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल ७ लाखांचा मुददेमाल हस्तगत केला आहे. 


छुप्या पद्धतीनं सट्टा

देशात सुरू असलेल्या आयपीएल या क्रिकेटच्या सामन्यांवर ठिकठिकाणी छुप्या पद्धतीनं सट्टा खेळला जात आहे. नुकत्याच झालेल्या चेन्नई आणि दिल्लीच्या सामन्यावर अंधेरीतील झेड लक्झरी रेसीडन्सी या हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार देसाई यांच्या पथकानं बुधवारी या हॉटेलची झाडाझडती घेतली. त्यावेळी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील ३०९ क्रमांकाच्या खोलीत हे दोघेही एका संकेतस्थळाच्या माध्यमातून आयपीएलवर सट्टा लावत होते. त्याचबरोबर जबलपूर आणि कोलकत्ता येखील बुकीच्या ही हे दोघे संपर्कात असल्याचं दिसून आलं. या दोघांनी हॉटेलमध्ये ६ दिवसांसाठी रुम घेतली होती. त्यासाठी त्यांनी ४० हजार रुपये हॉटेल चालकाला दिले होते. 


६ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी ७ मोबाइल, २ लॅपटॉप, एक नोटबुक, २ पासपोर्ट, विविध बँकांचे डेबीट आणि क्रेडिटकार्ड, हाँगकाँग आणि अमेरिकन डॉलर्स असा ६ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दोघांसोबत अन्य काही व्यक्तींचा ही या गुन्ह्यात समावेश असल्याचं पुढे आले असून त्या अनुशंगाने पोलिस तपास करत आहेत. 



हेही वाचा -

दिंडोशी येथे बेस्टच्या धावत्या बसला आग

यंदा पावसाळ्यात २८ दिवस मोठी भरती आणि १२ दिवस नीप टाईड



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा