Advertisement

दिंडोशी येथे बेस्टच्या धावत्या बसला आग

मुंबईतील गोरेगाव पुर्वेच्या दिंडोशी येथे एका धावत्या बसला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. बेस्ट बसनं गोकुळधाम परिसरात अचानक पेट घेतला. बसला आग लागली त्यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्यामुळं मोठी दुर्घटना टळली.

दिंडोशी येथे बेस्टच्या धावत्या बसला आग
SHARES

मुंबईतील गोरेगाव पुर्वेच्या दिंडोशी येथे एका धावत्या बसला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव स्टेशनवरून नागरी निवारा परिषद येथे जात असणाऱ्या ३४४ नंबरच्या बसनं गोकुळधाम परिसरात अचानक पेट घेतला. बसला आग लागली त्यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्यामुळं मोठी दुर्घटना टळली. त्यावेळी या बसमध्ये फक्त चालक आणि कंडक्टर हे दोघेच होते. दोघांनी आग लागताच बसमधून उड्या मारत पळ काढल्यानं जीवीतहानी टळली.


बसला आग

शुक्रवारी सकाळी ७.२० वाजचाच्या सुमारास गोरेगाव पुर्वेच्या दिंडोशी येथे बेस्टच्या बसला आग लागली. बसला लागलेल्या आगीमुळं या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २ गाड्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.



सीएनजी गळतीमुळं आग

दरम्यान, बसला आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट अाहे. मात्र, याबाबत अधिक तपास केला असता सीएनजी टाकीच्या व्हॉलच्या बाजूनं गळती झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.



हेही वाचा -

अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या बंगल्याला नोटीस

एमआयजी क्रिकेट क्लबच्या पॅव्हेलियनला सचिन तेंडुलकरचं नाव



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा