कुत्रीवर बलात्कार करणाऱ्याची रवानगी तळोजा कारागृहात

नूरीच्या बातमीनंतर आणखी एका मादी कुत्रीवर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातही सीसीटीव्ही फुटेजमुळे नेरूळ स्थानकाबाहेर एका रस्त्यावर कुत्रीवर लैंगिक चाळे करणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला पकडण्यात आलं आहे.

रविवारी नेरुळ रेल्वे स्थानकातून त्यास अटक करण्यात आली. बुधवारी त्याला तळोजा तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. या भटक्या कुत्र्यांच्या आणि अत्याचारासाठी न्यायाची मागणी करणारे कार्यकर्ते या प्रकरणाच्या सुनावणीवर समाधानी आहेत.

यापर्वी नुरी या कुत्रीवर देखील काही दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. आरोपीनं तिच्या खाजगी अवयवांमध्ये ११ इंचाची लाकडी रॉड घातला होता. एका प्राणी प्रेमीला ती रक्ताच्या थारोळ्यात पडडलेली सापडली. त्यानंतर त्या व्यक्तीनं तिला रुग्णालयात नेलं. तिच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली.

पशूप्रेमींनीही नुरीच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्यासाठी दान मोहीम आयोजित केली होती. ती सध्या स्थिर आहे आणि औषधांना चांगला प्रतिसाद देत आहे. तिच्या गुन्हेगारालाही वेळेत मुंबई पोलिसांनी पकडले. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीस पोलिसांनी पकडले.


हेही वाचा

नवी मुंबई : कुत्रीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक

किती हा द्वेष? मुस्लिम आणि पाळीव प्राण्यांना नो इन्ट्रीची जाहिरात

पुढील बातमी
इतर बातम्या